दिल्ली महापालिका निवडणुकीत ‘आप’चे वर्चस्व, भाजप दुसऱ्या स्थानी

काँग्रेसचा झाला सफाया

दिल्ली महापालिका निवडणुकीत ‘आप’चे वर्चस्व, भाजप दुसऱ्या स्थानी

दिल्लीतील महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीने मुसंडी मारली असून भाजपाने त्यांना टक्कर दिली असली तरी आपने बहुमताकडे वाटचाल केली आहे.

दिल्ली महापालिकेत २५० जागा असून त्यात १३२ जागांवर आप आघाडीवर असून १०४ जागी भाजपाची आघाडी आहे. काँग्रेसचा मात्र या निवडणुकीत सफाया झालेला आहे. त्यांना ९ जागी आतापर्यंत विजय मिळालेला आहे.

४ डिसेंबरला या निवडणुकीसाठी मतदान झाले. एकूण १३४९ उमेदवारांनी या निवडणुकीत आपली ताकद आजमावली. दिल्लीतील तीन महापालिका एकत्र आल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे. २०१७मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने तत्कालिन २७० जागांपैकी १८१ जागा जिंकल्या होत्या तर आम आदमी पार्टीला ४८ जागांवर विजय मिळाला होता. काँग्रेसला तेव्हा ३० जागा मिळाल्या होत्या यावेळी मात्र अजूनपर्यंत एकआकडी संख्याच त्यांनी गाठली आहे.

हे ही वाचा:

 १०० फूट खाली असलेल्या बोगद्यातून धावली पुणे मेट्रो

बाहेरचं वातावरण तुम्हाला सूट होत नाही संजयजी, पुन्हा आराम करायची वेळ येऊ नये

एमएसआरटीसीने रोखल्या कर्नाटकात जाणाऱ्या बसेस

ममतांना कळले ते ठाकरे-पवारांना कधी कळेल?

भारतीय जनता पार्टीचे दिल्ली पालिकेत १५ वर्षांपासून वर्चस्व आहे. हे वर्चस्व आता संपले आहे. या विजयी घोडदौडीनंतर आम आदमीचे दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, जनतेने १५ वर्षे पालिकेत असलेले भाजपा सरकार उलथवून टाकले आहे. त्याबद्दल जनतेचे आभार. या बदलासंदर्भात मी दिल्लीच्या जनतेचे आभार मानतो. दिल्लीत भ्रष्टाचार दूर करण्यासाठी शिवाय, दिल्लीतील अनेक समस्यांच्या मुळापर्यंत जाण्यासाठी लोकांनी आमच्या पक्षाला निवडून दिले आहे. केजरीवाल म्हणाले की, आम्हाला आता भाजपाने या कारभारात सहाय्य करावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद आम्हाला हवेत

८ तारखेला गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. त्यामुळे तिथे भाजपाला कसे यश मिळते हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

Exit mobile version