25 C
Mumbai
Saturday, January 11, 2025
घरराजकारणएकीकडे केजरीवाल तुरुंगात.. दुसरीकडे दिल्ली सरकारच्या मंत्र्यांचा राजीनामा!

एकीकडे केजरीवाल तुरुंगात.. दुसरीकडे दिल्ली सरकारच्या मंत्र्यांचा राजीनामा!

राजीनाम्याचे कारण अद्याप अस्पष्ट

Google News Follow

Related

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात बंद आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत दिल्ली सरकार आणि आम आदमी पक्षाला मोठा फटका बसला आहे. केजरीवाल सरकारमधील मंत्री राजकुमार आनंद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ते दिल्ली सरकारमध्ये समाजकल्याण मंत्री म्हणून कार्यरत होते. ते पटेल नगरचे आमदार असून जाटव समाजाचे मोठे नेते आहेत.दरम्यान, २०२० मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांना ६१ टक्के मते मिळाली होती.

राजकुमार आनंद हे देखील अनेक दिवसांपासून अंमलबजावणी संचालनालयाच्या निशाण्यावर आहेत. ईडीने नोव्हेंबर २०२३ मध्ये आनंद यांच्याशी संबंधित जागेवर छापे टाकले होते. मंत्रीपद आणि आम आदमी पक्ष सोडण्यापूर्वी ते म्हणाले की, आज मी खूप दुःखी आहे. राजकारण बदलले तर देश बदलेल. त्यांनी आम आदमी पक्षावर मोठा आरोप केला आणि म्हणाले की, मी या पक्षाचा, सरकारचा आणि मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे.’आप’चा जन्म भ्रष्टाचाराच्या विरोधात झाल्याचे त्यांनी सांगितले.तसेच पक्षावर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे दुखावल्याचे सांगत राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

ओवेसिंच्या विरोधात कॉंग्रेस उमेदवार देणार नाही

परगाणा भागात इस्लामवाद्यांचा हिंदुंवर हल्ला

रश्मी बर्वेंना दणका; जात पडताळणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची १०वी यादी आली समोर!

पत्रकार परिषदेला संबोधित करताना आनंद यांनी आम आदमी पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये कोणताही दलित नेता नसल्याचा आरोप केला. आम आदमी पक्षाच्या दलित आमदार, मंत्री किंवा नगरसेवकांना आदर दिला जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.दरम्यान, राजकुमार आनंद पुढे काय करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजप किंवा काँग्रेससह अन्य कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार का? याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा