25 C
Mumbai
Friday, January 31, 2025
घरराजकारणहरयाणाकडून दिल्लीला दिल्या जाणाऱ्या पाण्यात विष; केजरीवाल यांचा धक्कादायक आरोप

हरयाणाकडून दिल्लीला दिल्या जाणाऱ्या पाण्यात विष; केजरीवाल यांचा धक्कादायक आरोप

बुधवारी आरोप सिद्ध करण्याचे निवडणूक आयोगाकडून आव्हान

Google News Follow

Related

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरयाणा सरकारकडून यमुना नदीत विष मिसळले जाते असा गंभीर आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना उद्या रात्री ८ वाजेपर्यंत हे सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे.

केजरीवाल यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते की, दिल्लीत हरयाणाकडून जो पाणी पुरवठा करण्यात येतो त्यात विष मिसळण्यात येते. यासंदर्भात आता उद्या रात्री ८ पर्यंत केजरीवाल याना पुरावे देण्यास सांगण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाने अनेक खटले आणि न्यायालयाने दिलेले आदेश यांचे दाखले देत म्हटले आहे की, या विधानामुळे केजरीवाल याना देशाची एकात्मता आणि शांतता भंग करण्याच्या आरोपाखाली तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते.
आयोगाने म्हटले आहे की, अशा आरोपांमुळे दोन राज्यात वैमनस्य निर्माण होऊ शकते तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो.

त्याआधी, हरयाणा सरकारकडून दिल्लीला केल्या जाणाऱ्या पाण्यात अमोनियाचे प्रमाण अधिक असल्याचा जो आरोप केला गेला होता, त्यासंदर्भात २८ जानेवारी पर्यंत अहवाल सादर करण्यास निवडणूक आयोगाने सांगितले होते.

हे ही वाचा:

मुंबई उपनगरांना ‘मिनी बांग्लादेश’ बनू देणार नाही

एनआयएने तामिळनाडूमध्ये १६ ठिकाणी छापे

विद्यार्थ्याने दोन मिनिटात सांगितली १२० तालुक्यांची नावे, मुख्यमंत्री म्हणाले, ‘हे अस्सल हिरे’

राणा अय्युब विरुद्ध एफआयआर दाखल

२७ जानेवारीला एका रॅलीत केजरीवाल म्हणाले होते की, दिल्लीच्या जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्यात येते आहे. भाजपा हे पाप करत असून त्यापेक्षा मोठे पाप कोणतेही नाही. हरयाणातून जे पाणी पुरवले जात आहे त्यात यांनी विष मिसळले आहे.

केजरीवाल यांनी असेही म्हटले की, हे पाणी इतके विषारी आहे की, दिल्लीच्या पाणी शुद्धीकरण केंद्राकडून ते स्वच्छ होऊ शकत नाही तसेच भाजपा दिल्लीतील लोकांची असे पाणी देऊन सामूहिक हत्या करू इच्छिते. पण आम्ही ते होऊ देणार नाही. हरयाणाच्या नायब सिंग सैनी सरकारने केजरीवाल यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.

भाजपानेच नव्हे तर काँग्रेसनेही केजरीवाल यांना आव्हान देत हे आरोप सिद्ध करण्यास सांगितले आहेत तसेच ते सिद्ध करता आले नाहीत तर त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करावेत अशी मागणीही केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
227,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा