धान्य पुरवठ्यावरून केजरीवाल यांचे रडगाणे सुरू

धान्य पुरवठ्यावरून केजरीवाल यांचे रडगाणे सुरू

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते दिल्लीतील गरीबांना रेशनचा पुरवठा करण्यावरून. या रेशनच्या पुरवठ्याला केंद्र परवानगी देत नाही, असा कांगावा करण्यास त्यांनी सुरुवात केली असून केंद्राकडून मात्र अशी कोणतीही आडकाठी केजरीवाल सरकारला आणण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

केजरीवाल यांनी गेल्या महिन्यात असे जाहीर केले होते की, ५ किलो धान्य (४ किलो गहू आणि १ किलो तांदूळ) यांचा पुरवठा राज्य सरकारच्या वतीने दिल्लीतील ७० लाख रेशनकार्डधारकांना करण्यात येईल. शिवाय केंद्राकडून मिळणाऱ्या अतिरिक्त ५ किलोचाही पुरवठा केला जाईल. मात्र आता केंद्राकडून रेशनचा पुरवठा करण्यास हिरवा कंदिल दाखविला जात नसल्याची तक्रार केजरीवाल यांनी जाहीररित्या केली आहे. त्यावरून पुन्हा एकदा केजरीवाल सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात संघर्ष पेटला आहे.

हे ही वाचा:
नायजेरियन सरकारचा ट्विटरला दणका

पर्यावरण मंत्र्यांच्या मतदारसंघातच झाडांची कत्तल

दिलीप कुमार रुग्णालयात दाखल

खासदारकीवर दृष्टी, PR चा कोन

दोन वर्षांपूर्वी आणि त्यानंतरच्या वर्षातही केजरीवाल यांनी घरोघरी रेशनचा पुरवठा करण्यास परवानगी दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे यावेळी केंद्राकडून परवानगी मिळाली नसल्याचा कांगावा करत असल्याचा आरोप होत आहे.

जर पिझ्झा घरोघरी दिला जात असेल तर रेशनचे धान्य घरोघरी का नको, असा भावनिक सवाल करत केजरीवाल यांनी स्वतःबद्दल सहानुभूती मिळविण्याचा पुन्हा प्रयत्न केला आहे.

अशा प्रकारे कोणतीही आडकाठी केंद्र सरकारकडून करण्यात आलेली नाही असे दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणतात की, या रेशन पुरवठ्याला कोणताही विरोध आम्ही केलेला नाही. उलट या अन्नधान्य पुरवठ्याच्या पद्धतीत आम्ही सुधारणा हवी असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार केंद्राची परवानगी या पुरवठ्यासाठी हवी आहे. दुसरे कारण आहे ते म्हणजे दिल्लीतील सरकारी रेशन विक्रेते संघाने दिल्ली उच्च न्यायालयात दिल्ली सरकारच्या या योजनेविरोधात याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी ऑगस्ट महिन्यात आहे.

याआधीही, केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह झालेल्या एका ऑनलाइन बैठकीत आपले गाऱ्हाणे मांडताना व्हीडिओ सर्वसामान्यांना दिसेल याची तजवीज केली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी त्यांना झापले होते. कोरोनासंदर्भातील सगळी तयारी आपण केल्याचा दावाही केजरीवाल यांनी वारंवार केला होता, पण केंद्राकडून साथ मिळत नसल्याचा दावाही ते नंतर करताना दिसले आहेत. यावेळीही केजरीवाल यांचा हा बनाव स्पष्ट होत आहे.

Exit mobile version