तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करण्यापूर्वी केजरीवाल हनुमानाच्या चरणी

दिली मद्य धोरण घोटाळ्यात ईडीने केली होती अटक

तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करण्यापूर्वी केजरीवाल हनुमानाच्या चरणी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे रविवारी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करणार आहेत. दिल्ली दारू धोरण प्रकरणात त्यांचा अंतरिम जामीन १ जून रोजी संपला असून त्यांना मुदतवाढ मिळालेली नाही. अशातच केजरीवाल हे तिहार तुरुंगात जाण्यापूर्वी राजघाट येथील महात्मा गांधींच्या स्मारकाला आणि कॅनॉट प्लेसमधील हनुमान मंदिराला भेट देणार आहेत.

दिल्ली दारू धोरण प्रकरणात केजरीवाल यांचा तीन आठवड्यांचा अंतरिम जामीन १ जून रोजी संपला. आप प्रमुख अरविंद केजरीवाल हे दुपारी ३ च्या सुमारास तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करण्यासाठी जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे केजरीवाल यांच्या वैद्यकीय विषयक अंतरिम जामीनासाठीच्या याचिकेला दिल्ली न्यायालयाने ५ जूनपर्यंत स्थगिती दिली आहे.

तुरुंगात जाण्यापूर्वी ते दिल्लीतील डीडीयू मार्गावरील आप कार्यालयात जाऊन पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेणार असल्याचीही माहिती आहे. “सर्वप्रथम मी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करेन. तेथून मी हनुमानजींचे आशीर्वाद घेण्यासाठी कॅनॉट प्लेसमधील हनुमान मंदिरात जाईन आणि तेथून मी पक्ष कार्यालयात जाऊन सर्व कार्यकर्त्यांची भेट घेईन. तेथून मी पुन्हा तिहारला रवाना होणार आहे,” असे केजरीवाल यांनी ट्विट केले आहे.

हे ही वाचा:

पाकव्याप्त काश्मीर म्हणजे विदेशी भूमी; चक्क पाकिस्तान सरकारची न्यायालयात कबुली

‘मां तुझे सलाम’ गाणे म्हणता म्हणता माजी सैनिकाने गमावले प्राण

प. बंगालमधील जयनगर मतदारसंघातल्या केंद्रातील ईव्हीएम तलावात फेकले

चेन्नईहून मुंबईकडे येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी

गेल्या आठवड्यात, केजरीवालांनी वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन सात दिवसांच्या वाढीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. केजरीवाल यांनी दावा केला की त्यांना चाचण्यांसाठी वेळ हवा होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दणका दिला. त्यानंतर त्यांनी अंतरिम जामीनासाठी विशेष सीबीआय-ईडी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ५ जूनपर्यंत निकाल राखून ठेवला आहे. ईडीने केजरीवाल यांच्या याचिकेला विरोध केला असून युक्तिवाद केला आहे की, आप प्रमुखांनी संपूर्ण निवडणुकीत प्रचार केला तेव्हा त्यांना कोणतीही आरोग्य समस्या नव्हती.

Exit mobile version