आव्हाड साहेब…उद्धव ठाकरेंना तुमच्याकडेच ठेवा

आव्हाड साहेब…उद्धव ठाकरेंना तुमच्याकडेच ठेवा

भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या टोकदार ट्विट्सच्या माध्यमातून ते रोज विरोधकांना धोबीपछाड देत असतात. शनिवारी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला.

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. देशातली सर्वाधिक कोरोना रूग्णसंख्या ही महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात लाॅकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी नियोजन करण्याच्या सुचनाही प्रशासनाला दिल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला लाॅकडाऊनचा इशारा दिला. यावरून राज्य सरकारवर चौफेर टीका होत असताना राज्यातील सत्ताधारी आपला बचाव करण्याच्या प्रयत्नात आहेत. मग यासाठी कोणी केंद्राकडे बोट दाखवत आहेत तर कोणी उद्धव ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट लिहीत आहेत.

हे ही वाचा:

…आणि महाराष्ट्र काँग्रेस पडली तोंडावर

सचिन वाझेशी संबंधित आणखीन एक गाडी एनआयएच्या ताब्यात

मुंबईत लॉकडाऊन लावावाच लागेल-अस्लम शेख

इतका कन्फ्यूज मुख्यमंत्री महाराष्ट्राने पहिला नाही, मनसेचे सडेतोड

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी असेच एक ट्विट शनिवारी केले. “पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय.टिका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत..
त्यास सलाम! सलाम!! सलाम!!!” असे आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे

या ट्विटला प्रत्युत्तर देताना आमदार नितेश राणे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पिसे काढली आहेत. “महाराष्ट्राची वाट लावणे, महाराष्ट्र विकायला काढणे, कुटुंबा पलीकडे नाही बघणे म्हणजे महाराष्ट्र सांभाळणे म्हणतात!!! मग उद्धव ठाकरेना तुमच्या कडेच ठेवा आणि रोज उठून सलाम ठोकत बसा आव्हाड साहेब!!!” असे जळजळीत ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.

Exit mobile version