महाराष्ट्रातील विकासाच्या दुश्मनांना सत्तेच्या बाहेर ठेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाविकास आघाडीवर खोचक टीका

महाराष्ट्रातील विकासाच्या दुश्मनांना सत्तेच्या बाहेर ठेवा

महाराष्ट्रातील विकासाच्या दुश्मनांना सत्तेच्या बाहेर ठेवा. अगदी शेकडो मैल दूर ठेवा, असा खोचक सल्ला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला दिला. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ठाण्यात विविध विकास कामांचे उद्घाटन पार पडले. यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.

“महाराष्ट्रात येताना एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. हा फक्त महाराष्ट्राचा आणि मराठीचा सन्मान नाही तर मराठी साहित्य कला आणि संस्कृतीचा देखील सन्मान आहे. देशातील सर्व मराठी बोलणाऱ्यांना शुभेच्छा देतो,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

एकीकडे महायुती सरकारला राज्यात विकास करायचा आहे आणि दुसरीकडे काँग्रेस आणि महाआघाडीवाले लोक त्यांना जेव्हाही संधी मिळते ते सर्व कामं ठप्प करुन टाकतात. मेट्रो ३ चं काम फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरु झालं त्यावेळी ६० टक्के काम झालं होतं. पण नंतर मविआच्या काळात ही कामं थांबवण्यात आली. मविआमुळं जनतेच्या पैशांचा चुराडा झाला. मविआनं लोकांची काम रोखली होती आता तुम्हाला त्यांना रोखायचं आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. आम्हाला विकास कारायचा आहे आणि काँग्रेसने केलेल्या खड्यांनाही भरायचं आहे. विकसित भारत हे एनडीए सरकारचं लक्ष्य आहे, असं म्हणत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

हे ही वाचा..

चमत्कार… यासिन मलिक झाला गांधीभक्त, शिवभक्त झाले राहुल गांधी

काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी शेतकऱ्यांना गरीब करण्यात कोणतीही कसर सोडली नाही

उत्तर लेबनॉनवर इस्रायलकडून झालेल्या हल्ल्यात हमासच्या प्रमुख नेत्यासह कुटुंबीय ठार

एससीओमध्ये भारत-पाकिस्तान चर्चा नाकारली

आधी जे लोक राष्ट्रवादावर बोलायचे ते आता लांगूलचालन करत आहेत. वक्फ बिल आणलं तर लांगूलचालन करण्याच्या राजकारणात काँग्रेसचे नवे चेले आम्हाला विरोध करत आहेत. वीर सावरकारांवर काँग्रेस टीका करते तेव्हाही काँग्रेसचे चेले त्यांच्या पाठी उभे राहत आहेत. काँग्रेस म्हणते जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम लागू करू. पण काँग्रेसच्या चेलांची बोलती बंद आहे. नवीन व्होट बँकेसाठी विचारधारेचं एवढं पतन, काँग्रेसची अशी हुजरेगिरी सुरू आहे. महाराष्ट्रात आतापासूनच काँग्रेस रंग दाखवत आहे,” अशी खोचक टीका नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणादरम्यान केली.

Exit mobile version