तुम्हीच बाळासाहेबांचे नाव बाजूला करा

दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

तुम्हीच बाळासाहेबांचे नाव बाजूला करा

कोकणातील पैसे अजित पवारांनी काढले तेव्हा तुम्ही हू कि चू केले नाही अजित दादांसमोर बोलायची तुमची कधी हिम्मत झाली नाही तुमची खुर्ची सांभाळण्यासाठी कोकण्यांतल्या लोकांवर अन्याय केला आमचा पक्ष चोरला, चिन्ह चोरले माझ्या वडिलांचे नावपण चोरले हिम्मत असेल तर , तुमच्या वडिलांचे नाव घेऊन निवडणुकीला सामोरे जा बाळासाहेब ठाकरे यांना मते मिळाल्याशिवाय आता मोदिनासुद्धा मते मिळत नाही. अशी घणाघाती टीका माजी मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे आणि भाजप गटावर केली होती. काल खेड मधल्या सभेतून त्यांनी हल्ला चढवला. यासगळ्यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. तुम्हीच बाळासाहेब ठाकरे यांचे नाव बाजूला करा. अशा शब्दांमध्ये केसरकर यांनी टीका केली आहे.

केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला असून सध्या ते सहकुटुंब शिर्डीमध्ये आहेत. सकाळची काकड आरती झाल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. तुम्हीच बाळासाहेबांचे विचार सोडले , त्यामुळे तुम्हीच त्यांचे नाव सोडा शिवसेनेसाठी आम्ही आमच्या आमदारक्या पणाला लावल्या जर का तुमच्या बद्दलचा आदर तासाचा राहावा असे वाटत असेल तर तुम्ही संयमाने बोला. अशा शब्दात त्यांनी ठाकरे यांना इशारा दिला आहे.

हे ही वाचा:

भ्रष्ट लालू आता आम आदमी पक्षाला वाटू लागले आपले

होळीच्या सणाला ‘पुरणपोळीच्या’ किमतीवरून शिमगा

‘आपल्याच पक्षातील आमदारांना संपवायचे आणि दुसरीकडून भाड्याने घ्यायचे, हे उद्धव ठाकरेंचे काम’

ओळखीच्या लोकांना गुड बाय मेसेज करून शिवराज पाटील चाकूरकरांच्या भावाची आत्महत्या

औरंगाबादचे संभाजी नगर नामांतर सत्ता गेल्याची खात्री झाल्यावर एक प्रयन्त होता. आत्तापर्यंत मुंबईची जी लूट झाली त्या मुंबईला न्याय देण्याचे काम सुरु आहे. आजसुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी मागे फरफट जात च आहात ना? ज्या शरद पवारांनी खूप वेळा शिवसेना फोडायचा प्रयन्त केला त्यांच्याबरोबरच तुम्ही आहात. जे काही घडले त्याला तुमचे निर्णय कारणीभूत ठरले. सहानुभूतीची खोटी लाट निर्माण करण्याचा प्रयन्त करू नका. जागे व्हा आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा हे आम्ही तुम्हाला त्या वेळेस आसाममधून सुद्धा सांगितले होते.

खोके घेतले असते तर अडीच वर्ष तुमचे सरकार टिकले असते का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. पूर्ण भारत देशात मोदींना जो प्रतिसाद मिळतो तो शिवसेनेमुळे मिळतो का? मोदी तुमच्याशी किती चांगले वागले हे मला माहिती आहे. हिंदुत्वासाठी ज्या मोदींनी लढा दिला त्यांच्याबद्दल सामना या दैनिकात काय छापता . राऊत यांना तुम्ही अडवू शकत नाही? असे बरेच प्रश्न त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना विचारले.

 

Exit mobile version