ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात महिलेकडून गुन्हा दाखल
ठाण्यातील दिवंगत शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ते आणि बलात्काराच्या आरोपातील त्यांचा मित्र रोहित कपूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३७६, ५०६ अंतर्गत हा गुन्हा ना. म. जोशी पोलिस ठाण्यात दाखल आहे. केदार दिघे यांच्यावर नुकतीच ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जबाबदारी सोपविलेली आहे. त्यात आता हा आरोप झाल्यामुळे आणि गुन्हा दाखल झाल्यामुळे राजकारण पेटणार आहे.
या घटनेसंदर्भात जी तक्रार नोंदविण्यात आली आहे त्यानुसार सेंट रेजिस हॉटेल, लोअर परळ येथे काम करत असलेल्या २३ वर्षीय महिलेने रोहित कपूर आणि केदार दिघे यांची नावे नोंदविली आहेत. खासगी कंपनीत ही महिला क्लब ऍम्बेसिडर म्हणून काम करते. क्लब मऍरेट मेंबरशिपची माहिती देणे हे तिचे काम आहे.
२८ जुलैला या महिलेला रोहित कपूरने मेंबरशिप घेण्याच्या बहाण्याने सेंट रेजिसमध्ये जेवणास बोलावले. जेवण झाल्यावर तो थांबलेल्या रूममध्ये तिला येण्यास भाग पाडले. तिथे रोहित कपूरने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यावेळी त्या महिलेने कुठेही वाच्यता केली नाही.
हे ही वाचा:
राष्ट्रकुल स्पर्धेत आणखी दोन सुवर्णपदकांवर भारताची मोहोर
१००, २००च्या बनावट नोटा छापणाऱ्या चारजणांच्या गठड्या वळल्या!
पोलीस भरतीतला तरुण ‘डमी’ चित्रीकरणामुळे सापडला….
८००० वर्षांपूर्वीची संस्कृती; सौदी अरेबियाच्या वाळवंटात सापडले प्राचीन मंदिर
पण तिच्या मित्रांनी याला वाचा फोडण्यास सांगितल्यानंतर रोहित कपूरला व्हॉटसअपवर मेसेज पाठवून जाब विचारला पण त्याने व्हॉटसअप ब्लॉक केले. त्या महिलेने मित्रांच्या मदतीने रोहित कपूरला विचारणा केली पण त्याने प्रतिसाद दिला नाही. तेव्हा रोहित कपूरने आपला मित्र केदार दिघेसह या महिलेला पैशाचे आमिष दाखवले. तिने नकार देताच केदार दिघे यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून आता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.