तेलंगणाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना का भेटत आहेत?

तेलंगणाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना का भेटत आहेत?

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आज मुंबईत येणार असून ते आज, २० फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी के. चंद्रशेखर राव यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती तसेच त्यांनी केसीआर यांना त्यांनी मुंबईत येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानंतर केसीआर हे मुंबईत येत आहेत.

सध्या शिवसेना आणि भाजप यांच्यात राजकीय वाद सुरू असून आता शिवसेनेकडून राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये आता काय चर्चा होणार याकडे लक्ष असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी के. चंद्रशेखर राव यांना फोन केला होता. फोनवर झालेल्या या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी केसीआर यांना २० फेब्रुवारीला मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले होते.

हे ही वाचा:

‘मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी स्पेशल कॅग ऑडिट करण्याची गरज’

कवठेमहांकाळची निवडणूक बनावट मतदारांमुळे वादात

उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये मतदानाला सुरुवात

… म्हणून विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटर अकाऊंट केलं डिऍक्टिव्हेट

केंद्रातील भाजप सरकार विरुद्ध के. चंद्रशेखर राव हे सातत्याने आवाज उठवत असतात. मोदी सरकारच्या व्यक्तीविरोधी धोरणांचा विरोध आणि देशाच्या संघराज्य पद्धतीच्या संरक्षणासाठी केसीआर हे केंद्राविरोधात आंदोलन करणार आहेत. फोनवरील चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी केसीआर यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला होता. भाजपविरोधात देश पातळीवर आघाडी उघडण्यासाठी अधिक वेगाने काम करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे आता या भेटीमध्ये काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Exit mobile version