तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल, तसेच शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे हे उपस्थित होते. तर अभिनेते प्रकाश राज हे देखील या बैठकीला होते. राव आणि पवार यांच्यातल्या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
त्यावेळी राव यांनी या भेटीबादला माहिती दिली. देशातल्या सर्व परिस्थितीबाबत भाजपा विरोधात सर्व समविचारी पक्षांनी एकत्र यावे असे राव यांनी सांगितले. तर परिवर्तनाच्या लढ्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले. शरद पवार आमचे मार्गदर्शक आहेत. समविचारी पक्षांची बैठक बारामतीत व्हावी असाही त्यांनी प्रस्ताव ठेवला आहे. त्यावरही विचार सुरू आहे. त्यांनी मला आशीर्वाद दिले आहेत असे राव यांनी यावेळी सांगितले.
हे ही वाचा:
मिठागराच्या जमिनीवर सेना आमदार उभारणार थीम पार्क?
तेलंगणाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना का भेटत आहेत?
ठाकरे-राव भेट! तिसऱ्या आघडीच्या उचक्या पुन्हा सुरु
लोकपालची मागणी करणारे केजरीवाल लोकायुक्त नियुक्त करत नाहीत
आजची बैठक वेगळी होती. आज देशासमोर अनेक समस्या आहेत. गरीबी, शेतकऱ्यांचे प्रश्न,बेरोजगारी, यावर मार्ग काढण्यासाठी आपण काय केले पाहिजे. ही जबाबदारी आपल्यावर आहे, याबद्दल आमचे बोलणे झाले. आज आम्ही भेटलो तेव्हा राजकीय चर्चा कमी केल्या. कारण त्या अनेकदा होत असतात. पण आज आम्ही फक्त विकासावर चर्चा केली असे शरद पवार यांनी सांगितले. विकासासाठी एकत्र येऊन प्रयत्न केला पाहिजे. येणाऱ्या काळात कधी भेटायचं? कुठे भेटायचं ते ठरवू असे पवार म्हणाले.