28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणतेलंगणमधील पराभवाला स्वतः केसीआरच कारणीभूत

तेलंगणमधील पराभवाला स्वतः केसीआरच कारणीभूत

Google News Follow

Related

तेलंगण राज्यात विकासकामे केल्याचे सांगत देशभरात यश मिळवण्यासाठी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भारतामध्येही तशीच कमाल दाखवू, असे आश्वासन देत भारत राष्ट्र समितीची स्थापना केली खरी, मात्र त्यांचा स्वतःच्याच मतदारांवर प्रभाव पडू शकला नाही. इतकेच नव्हे तर त्यांची जन्मभूमी असलेल्या कामारेड्डी मतदारसंघात त्यांना पराभव पत्करावा लागला. केसीआर यांचा शेवटचा पराभव सन १९८३मध्ये झाला होता. तेव्हा त्यांची पहिलीच विधानसभा निवडणूक होती. त्यांचा सिद्दीपेठ मतदारसंघात अवघ्या ८८७ मतांनी पराभव झाला होता.

त्यानंतर केसीआर यांनी आतापर्यंत विधानसभा आणि लोकसभेच्या ११ निवडणुका लढवल्या असून सर्वच्या सर्व जिंकल्या आहेत. यंदाही ते गजवेलमधून जिंकले आहेत, मात्र कामारेड्डीमधील पराभव त्यांच्या जिव्हारी लागू शकतो.

९० टक्के विद्यमान आमदारांना उमेदवारी भोवली

केसीआर यांची सर्वांत मोठी चूक ठरली ती, सुमारे ९० टक्के विद्यमान आमदारांना त्यांनी उमेदवारी दिली. त्यातील बहुतेक सर्व आमदारांनी दोनदा आमदारकी भूषवली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात मतदारसंघात तीव्र नाराजी होती. मात्र मतदार उमेदवारांकडे न बघता केवळ आपल्या नावावर मत देतील, असा केसीआर यांना अतिआत्मविश्वास होता. त्यांनी एका रॅलीत ‘जेव्हा तुम्ही मतदानाला जाल, तेव्हा तिथे ११९ केसीआर उभे आहेत, असा विचार करा,’ असे जाहीर आवाहन केले होते. मात्र हा अतिआत्मविश्वास त्यांना नडला आहे.

फायदा न मिळालेले नाराज

पक्षाच्या अनेक योजना लोकप्रिय होत्या. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात स्थानिक आमदारांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळेच सरकारच्या अनेक योजनांचा फायदा आमदारांच्या मर्जीतील लोकांना मिळाला. त्यामुळे साहजिकच अन्य लोकांमध्ये नाराजी होती. या नाराजीची फळे केसीआर यांना भोगावी लागली.]

गुणवत्ता नसणाऱ्यांना मंत्रिपदे

तेलंगणमध्ये गुणवत्ता नसणाऱ्यांना मंत्रिपदे दिली गेली. आयटी मंत्री के. टी. रामाराव आणि वित्त आणि आरोग्य मंत्री हरीश राव यांना वगळता, केसीआरच्या टीममध्ये दर्जेदार प्रतिभेचे मंत्री नव्हते. त्यामुळे या मंत्र्यांची कामगिरीही चांगली नव्हती, तसेच त्यांच्यात अहंकाराची वृत्तीही होती.

हे ही वाचा:

निकालाआधीच रेवंथ रेड्डी यांना भेटून पुष्पगुच्छ देणे भोवले

पाकिस्तानात दहशतवाद्यांकडून बसवर गोळीबार

परदेशांतील प्रसारमाध्यमांकडूनही मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक

मोदींवरील विश्वासाचं हे यश!

भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष

या वर्षी एप्रिलमध्ये, निवडणुकीची तयारी म्हणून केसीआर यांनी ३० आमदारांची यादी तयार केली होती, ज्यांना तिकीट मिळण्याची शक्यता नव्हती. यातील अनेक आमदारांनी दलित बंधू लाभार्थ्यांकडून लाच मागितल्याचा आरोप केला होता. पण इशारे देऊनही, केसीआरने त्यापैकी बहुतेकांना कायम ठेवले. त्यामुळे केसीआर हे भ्रष्टाचार हा मुद्दा मानत नाहीत, असा संदेश जनमानसात गेला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा