उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी केलेली एक जाहिरात डाव्या नेत्या कविता कृष्णन यांना चांगलीच झोंबली आहे. या जाहिरातीवरून कविता कृष्णन यांनी निरर्थक वाद उकरून काढला. ‘इंडियन एक्स्प्रेस’या वृत्तपत्रामध्ये छापण्यात आलेल्या जाहिरातीबद्दल आक्षेप घेत थेट आदित्यनाथ योगी यांच्यावर कृष्णन यांनी ही जाहिरात ‘इस्लामोफोबिक’ असल्याचे म्हणत टीका केली आहे.
योगी सरकारने केलेल्या या जाहिरातीमध्ये ‘फर्क साफ है’ असा मथळा असून त्याखाली ‘२०१७ पूर्वी’ आणि ‘२०१७ नंतर’ अशा ओळी लिहून दोन फोटोंच्या माध्यमातून योगी सरकारच्या कार्यकाळात झालेला विकास, बदल हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या फोटोत हिंसक व्यक्ती दुसऱ्या फोटोत माफी मागत आहे. म्हणजेच योगी सरकारच्या आधी गुन्हेगारांवर वचक नव्हती. मात्र, योगी सरकार आल्यापासून गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात आली असून त्यांना योग्य शिक्षा दिली जाते असा संदेश या जाहिरातीतून देण्याचा योगी सरकारचा प्रयत्न आहे.
हे ही वाचा:
लॉकडाऊनच्या निर्णयावरून ठाकरे सरकारमध्येच संभ्रम?
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सरकारला आठवले वचन; ५०० स्क्वेअर फूटांपर्यंतच्या घरांना करमाफी
नवीन वर्ष महागाईचे की स्वस्ताईचे? वाचा सविस्तर
लहान मुलांच्या लसीकरण नोंदणीला आजपासून सुरुवात
जाहिरातीकडे बारकाईने पाहिल्यास तिथे हा तरुण मुस्लीम समाजाचा आहे असे स्पष्ट होत नाही किंवा हा तरुण कोणत्या एका विशिष्ट धर्माचा आहे हे स्पष्ट होत नाही. जाहिरातीतल कोणत्याही मजकुरावरूनही या व्यक्तीचा धर्म, जात स्पष्ट होत नाही. त्यामुळे कविता कृष्णन यांनी निरर्थक टीका करत हे वाद उकरून काढले आहेत. योगी सरकारवर टीका करत असताना त्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राला फॅसिझमचा वाहक म्हटले आहे.
योगी सरकारच्या जाहिरातीत फक्त असे म्हटले आहे की, प्रशासनातील फरक स्पष्ट आहे, २०१७ पूर्वी लोकांना दंगलखोरांची भीती वाटत होती आणि २०१७ नंतर दंगलखोर पोलिसांची माफी मागत आहेत. “सोच इमानदार, काम दमदार” म्हणजे “प्रामाणिक हेतू, चांगले काम” असे जाहिरातीत म्हटले आहे.