काश्मीर मधील फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवार, १ सप्टेंबर रोजी राहत्या घरी त्यांनी आपला जीव सोडला. ते हुर्रियत कॉन्फरन्स (जी) चे माजी अध्यक्ष होते. गिलानी हे गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. त्यांच्या छातीत दुखत असून त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता.
सय्यद अली शाह गिलानी यांचा जन्म २९ सप्टेंबर १९२९ या दिवशी झाला. ते आधी जमात-ए-इस्लामी काश्मीर या संघटनेचे सदस्य होते. तर नंतर त्यांनी पुढाकार घेत तेहरीक-ए-हुरियत या संघटनेची स्थापना केली. काश्मीर मधील फुटीरतावादी नेते म्हणून ते ओळखले जात होते. भारताचे अविभाज्य अंग असलेल्या जम्मू-काश्मीर राज्याला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा देण्यात यावा अशी त्यांची मागणी होती.
हे ही वाचा:
‘क्लिन चीट’ रिपोर्टसाठी सीबीआय अधिकाऱ्याला देण्यात आली लाच!
सीएनएनला भारत सरकारची कृतीतून चपराक
अनिल देशमुखांचा जावई सीबीआयच्या ताब्यात
‘बेस्ट’ने एसटीला ७१ कोटी दिले तर पगार तरी निघतील!
जम्मू कश्मीर मधील फुटीरतावादी पक्ष्यांच्या गटाचे एकत्रीकरण करून स्थापन झालेल्या ऑल पार्टीज हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. गिलानी हे जम्मू-काश्मीर विधानसभेत तीन वेळा आमदार म्हणूनही निवडून गेले होते. १९७२, १९७७ आणि १९८७ अशा तीन वेळा त्यांनी सोपोरा या मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. गेल्या वर्षी जून २०२० मध्ये त्यांनी हुरियत कॉन्फरन्सचे प्रमुख पद सोडले.
गिलानी यांची कारकीर्द कायमच वादग्रस्त राहिली असून गेली अनेक वर्षे ते गृह कैदेत होते. त्यांचा पासपोर्ट भारत सरकार मार्फत जप्त करण्याऔ आला होता. तर त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला देखील चालला होता.