काश्मीर फाईल्सच्या टीमने घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट

काश्मीर फाईल्सच्या टीमने घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट

देशभर सध्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचा बोलबाला आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत असून नव नवे विक्रम रचताना दिसत आहे. अशातच आता काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या टीमने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, अभिनेत्री पल्लवी जोशी, अभिनेता अनुपम खेर, निर्माते अभिषेक अगरवाल हे योगी आदित्यनाथ यांना भेटले आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यानिओ या भेटीचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी चित्रपटाचे भरपूर कौतुक केले आहे. “द काश्मीर फाईल्स हा चित्रपट धार्मिक कट्टरता आणि दहशतवादाच्या अमानवी भयपटाला धैर्याने दाखवतो. हा चित्रपट समाज आणि देशाला जागृत करण्याचे काम करेल, यात शंका नाही. अशा विचार करायला लावणाऱ्या चित्रपटाच्या निर्मितीबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन.” असे योगींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींची जपानच्या पंतप्रधानांना ‘कृष्ण पंखी’ भेट

आर आर आर चित्रपटाची टीम पोहोचली स्टॅच्यू ऑफ युनिटीला

अगदी लवकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात

‘यांची मिलीजुली कुस्ती सुरू आहे आणि सगळे मिळून खेळत आहेत’

तर चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील या भेटीसाठी योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत. “तुमचे व्यस्त वेळापत्रक असूनही तुम्ही आमच्यासाठी इतका वेळ काढलात. खूप खूप धन्यवाद सर. तुमच्या अखंड भारताचे स्वप्न द काश्मीर फाईल्स या चित्रपटाने जगभरातील सर्व भारतीयांना त्या दिशेने जोडण्याचे अभूतपूर्व काम केले आहे. भारतीय संस्कृतीचा हा सुवर्णकाळ आहे.” असे विवेक अग्निहोत्री यांनी म्हटले आहे.

द काश्मीर फाईल्स हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला आहे. चित्रपटाचा हा दुसरा आठवडा असून चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. चित्रपटाने आत्तापर्यंत जगभरातून १५० कोटींपेक्षा अधिकच गल्ला जमवला आहे.

Exit mobile version