राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक हे रोज पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत असतात. त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले असून आरोपात त्यांनी म्हटले होते की, समीर वानखेडे आणि काशिफ खान यांची मैत्री आहे, काशिफ ड्रग पार्ट्या आयोजित करतो आणि पॉर्न रॅकेट चालवतो. आता काशिफ खानने मलिकच्या आरोपांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
समीर वानखेडे यांना ओळखतही नसल्याचे काशिफ याने सांगितले. तसेच काशिफने आपल्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. त्याचा कोणत्याही पॉर्न किंवा ड्रग रॅकेटशी काहीही संबंध नाही, असेही त्याने सांगितले आहे.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरे, शरद पवार आणि वानखेडे… काय आहे प्रकरण?
उत्तरप्रदेशात या सात पक्षांची भाजपाला साथ
टेनिस सोडून लिएंडर पेस राजकारण खेळणार
काशिफ खानने सांगितले की, भारत क्रूझवर झालेल्या त्या कार्यक्रमात फॅशन टीव्ही प्रायोजक म्हणून सहभागी होता. त्याने क्रूझचे तिकीट काढले होते. तसेच त्यांनी क्रूझवर झालेल्या खर्चाचा संपूर्ण हिशेब ठेवल्याचे आणि गरज पडल्यास ते पुरावे म्हणूनही सादर करतील असेही त्याने सांगितले.
नवाब मालिकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना काशिफ खानने म्हटले आहे की, हे सर्व आरोप धक्कादायक असून ड्रग्ज प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्याने म्हटले आहे. नवाब मलिक हे मंत्री आणि ताकदवान व्यक्ती आहेत. तसेच आपण त्यांचा आदर करत असल्याचे त्याने सांगितले.