“काशी माझी आहे आणि मी काशीचा”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीचे केले कौतुक

“काशी माझी आहे आणि मी काशीचा”

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवार, ११ एप्रिल रोजी वाराणसीच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी काशीच्या लोकांनी त्यांचे मनापासून स्वागत केले. तसेच दौऱ्यावेळी नरेंद्र मोदींनी ३,९०० कोटी रुपयांच्या ४४ प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी मेहंदीगंज येथे झालेल्या जाहीर सभेत काशीतील लोकांशी भोजपुरी भाषेत संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, “काशी माझी आहे आणि मी काशीचा आहे.” गेल्या १० वर्षांत वाराणसीचा विकास वेगाने झाला असून आता काशी हे केवळ प्राचीन शहर नाही तर एक प्रगतीशील शहर आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “उद्या हनुमान जयंती साजरी केली जाईल आणि आज, मला संकटमोचन महाराजांच्या काशीमध्ये तुम्हा सर्वांना भेटण्याची संधी मिळाली आहे. काशीचे लोक आज विकासाचा उत्सव साजरा करण्यासाठी येथे जमले आहेत. गेल्या १० वर्षांत वाराणसीचा विकास वेगाने झाला आहे. आज काशी हे केवळ एक प्राचीन शहर नाही तर एक प्रगतीशील शहर आहे. काशी आता पूर्वांचलच्या आर्थिक नकाशाच्या केंद्रस्थानी आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

सुधारित आरोग्य पायाभूत सुविधांवर बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, काशी आता आरोग्याची राजधानी बनत आहे. आज दिल्ली आणि मुंबई सारखी मोठी रुग्णालये तुमच्या घराजवळ आहेत. हा विकास आहे, जिथे लोकांना सुविधा मिळतात. जेव्हा तुम्ही आम्हाला तिसऱ्यांदा आशीर्वाद दिला, तेव्हा आम्ही सेवक म्हणून आमचे कर्तव्य देखील प्रेमाने पार पाडले.

हे ही वाचा : 

शेख हसिनांसह मुलगी आणि इतर १७ जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी!

दहशतवादी तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण आणि २०११ चे मोदींचे ट्वीट व्हायरल; काय आहे प्रकरण?

ट्रम्प यांच्या सवलतीनंतर भारतीय शेअर बाजार रुळावर; सेन्सेक्समध्ये उसळी

चीनला दणका; आयातीवरचा कर १२५ टक्के नव्हे, तर १४५ टक्के! कसा ते घ्या जाणून

पंतप्रधान मोदींनी समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले आणि सांगितले की ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे संपूर्ण जीवन महिला सक्षमीकरणासाठी समर्पित केले होते. आम्ही महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना नवीन ऊर्जा देण्यासाठी त्यांच्या चळवळीला पुढे नेत आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.

भाजपाच्या प्रयोगशाळेत, काँग्रेसचा प्रयोग...  | Dinesh Kanji | Rahul Gandhi | Congress | Priyanka

Exit mobile version