राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा मुंडे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. २०२४ मध्ये नवरा विरुद्ध बायको अशी लढत होणार असल्याचे करुणा यांनी म्हटले आहे. करुणा यांच्या या विधानामुळे त्यांनी धनंजय मुंडे यांना थेट आव्हान दिल्याचे म्हटले जात आहे. करुणा यांनी आधीच आपण राजकारणात एन्ट्री घेत असल्याचे स्पष्ट केले होते. पण त्यानंतर त्यांनी आता त्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधातच निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
काही महिन्यांपूर्वी करुणा मुंडे चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. आपले पती आणि महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर करून यांनी आपण राजकारणात दाखल होत असल्याचे सांगितले होते. त्यांनी शिवशक्ती सेना नावाचा पक्ष स्थापन केला आहे.
हे ही वाचा:
शिवसेनेचे सभासद कार्ड, पैसे उकळले मनसेच्या नावाने?
चिदंबरम म्हणाले, मी प्रियांका गांधींना आधीच सांगितले होते, पण…
‘पावनखिंड’ लवकरच ओटीटी प्लॅटफोर्मवर
राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?
पण आता करूणा थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत करुणा मुंडे उभ्या राहणार आहेत. त्यांच्या शिवशक्ती सेना या पक्षातर्फे त्या अधिकृत उमेदवार असणार आहेत. या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की माझा निवडणूक लढवण्याचा कोणताही विचार नव्हता. पण अनेक लोकांनी मला भेटून मी निवडणुकीला उभे राहावे अशी इच्छा व्यक्त केली त्यामुळेच आपण निवडणूक लढवणार असल्याचे करुणा यांनी स्पष्ट केले. तर यावेळी बोलताना २०२४ मध्ये नवरा विरुद्ध बायको अशी लढत होणार हे नक्की आहे असेही त्या म्हणाल्या. तर या लढतीची संपूर्ण जगात चर्चा होणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.