23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणदिग्विजय सिंग, कार्ति चिदंबरम काँग्रेसच्या चौथ्या यादीत

दिग्विजय सिंग, कार्ति चिदंबरम काँग्रेसच्या चौथ्या यादीत

महाराष्ट्रातील मतदारसंघांसह ४६ उमेदवारांची नावे जाहीर

Google News Follow

Related

काँग्रेसने शनिवारी लोकसभा उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. त्यात मध्य प्रदेशातील राजगडमधून ज्येष्ठ काँग्रेसनेते दिग्विजय सिंह आणि उत्तर प्रदेशच्यावाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उत्तर प्रदेशचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बहुजन समाजवादी पक्षातून निलंबित झालेले दानिश अली यांना उत्तर प्रदेशमधील अमरोहा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. संसदेत दानिश अली आणि भाजपचे खासदार रमेश बिधुरी यांच्यात जातीय वाद झाला होता. काँग्रेसच्या चौथ्या यादीत आसाममधील एक, अंदमान आणि निकोबारमधील एक, छत्तीसगडमधील एक, जम्मू-काश्मीरमधील दोन, मध्य प्रदेशमधील १२, महाराष्ट्रातील चार, मणिपूरमधील दोन, मिझोराममधील एक, राजस्थानमधील तीन, तमिळनाडूमधील सात, उत्तर प्रदेशमधील नऊ, उत्तराखंडमधील दोन व पश्चिम बंगालमधील एका उमेदवाराचा समावेश आहे.

हे ही वाचा:

खजिन्याच्या शोधासाठी निघाले होते, कारमध्ये मिळाले जळालेले तीन मृतदेह!

केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवू लागले!

आरसीबी पराभवानंतरही विराट कोहली सोशील मीडियावर व्हायरल

नवमतदारांचा नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद

रामटेकमधून रश्मी बर्वे यांना, भंडारा-गोंदियामधून प्रशांत पडोळे यांना, नागपूरमधून भाजपच्या नितीन गडकरी यांच्या विरोधात विकास ठाकरे यांना, गडचिरोलीमधून नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील फतेहपूर सीकरी जागेवरून रामनाथ सीकरवार, कानपूरमधून आलोक मिश्रा, झांसीमधून प्रदीप जैन, बाराबंकीमधून तनुज पुनिया, देवरियातून अखिलेश प्रताप सिंह, बांसगावमधून सदन प्रसाद यांना तिकीट देण्यात आले आहे.

उत्तराखंडच्या नैनिताल-उद्धमसिंह नगर जागेवरून प्रकाश जोशी, हरिद्वारमधून वीरेंद्र रावत यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. तर, पश्चिम बंगालच्या कूचबिहार जागेवरून प्रिय रॉय चौधरी यांना काँग्रेसने तिकीट दिले आहे. जम्मू काश्मीरच्या उद्धमपूर जागेवरून लाल सिंह, जम्मूतून रमन भल्ला यांना तिकीट मिळाले आहे. छत्तीसगडच्या बस्तर जागेवरून कवासी लखमा उमेदवार असतील. तमिळनाडूतील शिवगंगा मतदारसंघातून कार्ति चिदंबरम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा