24 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरराजकारणमोफत तिकीट द्या, वीज द्या...कर्नाटकवासी काँग्रेस सरकारच्या लागले मागे

मोफत तिकीट द्या, वीज द्या…कर्नाटकवासी काँग्रेस सरकारच्या लागले मागे

लोक वीज बिल भरण्यास नकार देत आहेत आणि महिला मोफत बसफेरीची मागणी करत आहेत.

Google News Follow

Related

कर्नाटकमध्ये काँग्रेसने पक्ष सत्तेत आल्यास दर महिन्याला २०० युनिट मोफत वीज तसेच महिलांसाठी मोफत बसफेरीची घोषणा केली होती. त्यामुळे काँग्रेसने आता ही निवडणूक आश्वासने लगेच पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिक करू लागले असून ते वीज आणि बस प्रवासासाठी पैसे देण्यास नकार देत आहेत.

निवडणुकीतील आश्वासने पूर्ण करायची आहेत आणि तीही लवकरात लवकर, हाच संदेश कर्नाटकातील काही लोक काँग्रेसला देत आहेत. इतके की लोक वीज बिल भरण्यास नकार देत आहेत आणि महिला मोफत बसफेरीची मागणी करत आहेत. काँग्रेसने जाहीरनाम्यात कर्नाटकातील लोकांना दरमहा २०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. काही लोकांनी याचा अर्थ असा घेतला की त्यांना त्यांची वीज थकबाकी भरण्याची गरज नाही, तर काहींनी अधिकार्‍यांना त्यांचे वीजमीटरच खंडित करण्यास सांगितले.

बेळगावी गावात काही लोकांनी वीजबिल भरण्यास नकार दिला. ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना वीज मीटरचे रीडिंग बंद करण्यास सांगितले. याचे कारण विचारले असता, ‘काँग्रेसने आम्हाला मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते,’ असे गावकरी म्हणतात. कोप्पल, कलबुर्गी आणि चित्रदुर्ग यांसारख्या जिल्ह्यांतील ग्रामस्थांनीही वीजबिल भरण्यास नकार दिला आहे. काँग्रेसने त्यांना मोफत वीज देऊ करण्याचे आश्वासन दिले असल्यामुळे त्यांना बिल भरण्याची गरज नाही, असा दावा त्यांनी केला. गेल्या सहा महिन्यांची नऊ हजार रुपयांची वीज थकबाकी भरण्यास सांगणाऱ्या गुलबर्गा इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेड (GESCOM) कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याची घटना कोप्पलमध्ये घडली.

हे ही वाचा:

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करायला जातानाच झाला अपघात

मायावतींचा संसदभवन उद्घाटनाला पाठिंबा; विरोधकांना सुनावले

मोदी म्हणाले, परदेश दौऱ्यात तिथले विरोधकही आपल्या देशासाठी कार्यक्रमांना उपस्थित होते!

व्हिएतनाममध्ये अदानी कंपनी करणार गुंतवणूक

काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात महिलांसाठी मोफत बस प्रवास हे आणखी एक आश्वासन दिले होते. रायचूरमधील एका महिलेलाही हे आश्वासन लगेच पूर्ण व्हावे, असे वाटत आहे. तिने तिकिटाचे पैसे देण्यास नकार दिल्याने महिलेचा बस कंडक्टरशी वाद झाला. “जर आम्हाला पैसे द्यावे लागत असतील तर त्यांनी बसप्रवास मोफत असल्याचे का जाहीर केले?”, असा प्रश्न बसचे तिकीट घेण्यास नकार देताना ही महिला विचारताना दिसत आहे. “आम्ही काँग्रेसला मतदान केले आहे. म्हणून आम्ही तिकीट खरेदी करणार नाही,” असे ती महिला म्हणताना ऐकू येत आहे. ही घटना मस्की-सिंधानूर बसमध्ये घडली.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत १३५ जागा जिंकून काँग्रेसने अभुतपूर्व विजय मिळवला आहे. गेल्या आठवड्यात, आपल्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या निवडणूक आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी तत्वतः मान्यता दिली, ज्याचा सरकारी तिजोरीवर अंदाजे वार्षिक ५० हजार कोटींचा बोजा पडणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा