कर्नाटकसोबत सुरू असलेल्या सीमावादावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जोरदार उत्तर विरोधकांना दिले आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र आपल्या सीमावर्ती बांधवाना वाऱ्यावर सोडणार नाही . त्यासाठी आपण इंच इंच त्यासाठी लढू असे उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे. मंगळवारी हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद यावरून सरकारला कोंडीत पकडण्याच प्रयत्न केला. पण फडणवीस यांनी या वादावर जोरदार उत्तर देऊन विरोधकांची हवा काढून टाकली.
सोमवारी विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधकांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संदर्भात ठराव केला जात नसल्याचा मुद्दा उचलून धरला. अधिवेशनात अचानक उपस्थित राहिलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सीमावादावरून टीका केली. हा केवळ भाषा आणि सीमांचा प्रश्न नसून ‘माणुसकीचा’ आहे.केंद्र सरकारने कर्नाटकच्या ताब्यातील महाराष्ट्रातील क्षेत्रे केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावेत अशी मागणी ठाकरे यांनी वरिष्ठ सभागृहात केली. विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकार सीमावादावर प्रस्ताव का मांडत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. मांडण्यात येणारा प्रस्ताव सोमवारच्या कार्यसूचीतही नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा अभिमान दुखावला आहे अशी टीकाही त्यांनी केली.
यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की ,मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना मान खाली घालायला लागेल अशी कोणाच्या बापाची हिंमत नाही. कोणाची हिंमत नाही. माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी पृथ्वीराज चव्हाण , भास्कर जाधव यांनी त्याबाबतच महत्व सांगितलं आहे. हा मुद्दा मह्त्वाचाच आहे आणि कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र आपल्या सीमावर्ती बांधवाना वाऱ्यावर सोडणार नाही . आपण इंच इंच त्यासाठी लढू . काय वाट्टेल ते झाले तरी. मग सर्वोच्च न्यायालय, केंद्र सरकार असेल आपण आपल्या सीमावर्ती भागातल्या लोकांचा विषय आणि त्यांच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी जे करायचे आहे ते करू असे स्पष्ट केले.
हे ही वाचा:
सुनील गावस्कर यांच्या मातोश्रींचे निधन
संजय राऊत यांचे योगदान आणि प्रतिकांची चोरी
त्या जुन्या व्हीडिओंचे हिशेब अंधारेबाई देतील काय?
संजय राऊत यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान काय?
सीमावादावर कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक असताना मुख्यमंत्री शिंदे मात्र मौन बाळगून आहेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, आपलं ठराव आणण्याची ठरलं होतं . मागच्या आठ्वड्यातलं वातावरण जरा गंभीर होत त्यामुळे तो आणता आला नाही. आज तो आण्याचा निर्णय होता पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका अधिकृत कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे सदनात ठराव आणता आला नाही. सीमावाडावर सोमवारी किंवा मंगळवारी ठराव आणू असे आश्वासन त्यांनी दिले. फडणवीस म्हणाले, कर्नाटकातील मराठी भाषिक लोकसंख्येला न्याय देण्यासाठी जे शक्य आहे ते करू. या मुद्यावर सरकार एक इंचही मागे येणार नाही.