29 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारण'बलात्कार टाळू शकत नसाल तर त्याची मजा घ्या' काँग्रेस आमदाराची मुक्ताफळे

‘बलात्कार टाळू शकत नसाल तर त्याची मजा घ्या’ काँग्रेस आमदाराची मुक्ताफळे

Google News Follow

Related

महिलांवरचे वाढते अत्याचार हा कायमच चर्चेचा आणि चिंतेचा विषय असतो. पण दुसरीकडे महिलांविषयी अत्यंत पातळी सोडून केलेली विधानेही अनेकदा कानावर पडत असतात. अशाच प्रकारे एका बेजबाबदार आणि प्रक्षोभक वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षाचे आमदार चर्चेत आले आहेत. कर्नाटक विधानसभेतील काँग्रेस आमदार के. आर. रमेश कुमार यांनी महिलांवर होणाऱ्या बलात्काराच्या संदर्भात चीड आणणारे वक्तव्य केले आहे. ‘जर बलात्कार टाळू शकत नसाल तर शांत पडून रहा आणि त्याची मजा घ्या’ असे के. आर रमेश कुमार यांनी म्हटले आहे.

गुरुवार, १६ डिसेंबर रोजी कर्नाटक विधानसभेत हा प्रकार घडला. कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन सध्या सुरु आहे. काँग्रेस पक्ष हा सध्या कर्नाटकमध्ये विरोधी बाकांवर बसला आहे. देशभर गाजलेल्या कृषी कायद्याच्या विषयात राज्याच्या विधिमंडळात चारचा व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षातर्फे केली जात होती. पण सत्ताधारी भाजपातर्फे याला विरोध केला जात होता. विधानसभेच्या अध्यक्षांनीही या मागणीला दुजोरा दिला नाही.

हे ही वाचा:

महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक

‘या’ तारखेपासून होणार दहावी- बारावीच्या परीक्षा

शरद पवार वाचणार स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र!

शिवसेनेला ठेंगा, निधी वाटपात राष्ट्रवादी, काँग्रेसची बाजी

या संदर्भातच के. आर. रमेश कुमार बोलायला उभे राहिले होते. तेव्हा त्यांनी मुक्ताफळे उधळली. ‘देअर इज अ से, इफ रेप इज इनएव्हिटेबल, देन लाय डाऊन अँड एन्जॉय इट’ असे इंग्रजी विधान त्यांनी केले. अर्थात जर बलात्कार टाळता येत नसेल तर शांत पडून रहा आणि त्याची मजा घ्या’! रमेश कुमार यांच्या या विधानामुळे समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. समाज माध्यमांवरून रमेश कुमार यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

के. आर. रमेश कुमार हे कर्नाटकमधील काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आहेत. ते कर्नाटक विधानसभेचे अध्यक्षही राहिले आहेत. दरम्यान के. आर. रमेश कुमार यांच्या या बेताल वक्तव्यासाठी त्यांच्यावर कारवाई करणार का? असा सवाल विचारला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा