सिडीएस जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती निधनानंतर समाज माध्यमांवर अपमानकारक टिप्पणी करणार्यांविरोधात कर्नाटक सरकार कठोर पाऊले उचलणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी या संबंधीचे आदेश दिले आहेत.
माध्यमांशी बोलताना बोमई यांनी या संदर्भातील माहिती दिली. त्यानंतर त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावरूनही या घटनांची गंभीर दखल घेत असल्याचे सांगितले आहे. “ज्या दुःखद हेलिकॉप्टर दुर्घटनेत आपण आपले सीडीएस जनरल बिपिन रावत यांना गमावले, त्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट्स आणि सोशल मीडिया पोस्ट्स खपवून घेतल्या जाणार नाहीत. अशा सर्व सोशल मीडिया पोस्टचा मी निषेध करतो. मी पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत अशा गुन्हेगारांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी. या कृती शिक्षेस पात्र असून त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा असे त्यांनी म्हटले आहे. तर देशातील प्रत्येक नागरिकांनी अशा पोस्टचा निषेध नोंदवायला हवा असे देखील म्हटले आहे.
Offensive Tweets and Social Media posts about the tragic chopper crash in which we lost our #CDSGeneralBipinRawat will not be tolerated. I strongly condemn all such messages and have instructed our Police Officials to take strict disciplinary legal action against the offenders.
— Basavaraj S Bommai (@BSBommai) December 10, 2021
हे ही वाचा:
तमिळ दिगदर्शक अली अकबर का सोडत आहेत इस्लाम?
… म्हणून ३०० मिनिटांसाठी एसबीआयच्या इंटरनेट सेवा राहणार बंद
एमआयएमची तिरंगा रॅली मुंबईच्या दिशेने
सीडीएस बिपिन रावत यांना लष्करी सन्मानात निरोप, १७ तोफांची दिली सलामी
बुधवार, ८ डिसेंबर रोजी तामिळनाडू येथे झालेल्या एका भीषण हेलिकॉप्टर अपघातात भारताचे सीडीएस जनरल बिपीन रावत त्यांच्या पत्नी आणि इतर ११ जणांचे निधन झाले. या निधनाच्या वृत्तांवर अपमानकारक टिपणी करणाऱ्या अनेक सोशल मीडिया पोस्ट गेल्या काही दिवसात पाहायला मिळाल्या. तर अनेक ठिकाणी निधनाच्या बातम्यांवर हसणारे नेटकरीही पाहायला मिळाले. या सर्व लोकांबद्दल प्रचंड चीड व्यक्त केली जात आहे.