हिजाबबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे संतप्त झालेल्या मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी आज ‘कर्नाटक बंद’ची हाक दिली आहे. मुस्लिम नेत्यांनी ऐच्छिक बंदची घोषणा केली आहे. संपूर्ण राज्य व्यापारी मंडळालाही आजच्या बंदमध्ये सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुस्लिम नेते सगीर अहमद यांनी गुरुवारी मुस्लिम समाजातील मौलवींची बैठक घेणार असल्याची घोषणा केली. बंदसाठी कोणावरही जबरदस्ती करण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.
मुस्लीम विद्यार्थिनींनी शिक्षणाच्या काळात शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी मिळावी यासाठी दाखल केलेल्या सर्व याचिका न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावल्या. न्यायालयाने निर्णय दिला की, मुस्लिम महिलांनी हिजाब घालणे हे धार्मिक प्रथेचा आवश्यक भाग नाही. आणि शाळा कॉलेजमध्ये शैक्षणिक संस्थांनी ठरवून दिले गणवेषच विद्यार्थिनींनी घालावे. यावर विद्यार्थी आक्षेप घेऊ शकत नाहीत. यासंदर्भात आदेश देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
न्यायालयाच्या निकालानंतर काही विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला होता. त्याच दिवशी अल्पसंख्याक समाजातील राजकीय नेते हिजाबबाबत चर्चा करण्यासाठी जमले होते. अमीर-ए-शरियत यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीला सलीम अहमद, जमीर अहमद खान, यूटी खादर, एनए हॅरिस, नझीर अहमद, रेहमान खान, खानिज फातिमा आदी उपस्थित होते.
हे ही वाचा:
गोव्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी प्रमोद सावंत यांच्यावर विश्वास
‘एएसआय’ ला पोलीस आयुक्तांची होळीची खास भेट
जनरल बिपिन रावत यांच्या नावाने ‘चेअर ऑफ एक्सलन्स’
राज्यात कोरोनाने घेतला हजारो मुलांचा जीव
त्यावेळी न्यायालयाच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेवर टाकलेल्या बहिष्कारावर मौलवींनी आक्षेप घेतला आहे. त्याचबरोबर अमीर-ए-शरियत म्हणाले, न्यायालयाने याचिका फेटाळली तरी आपल्यला सुप्रीम कोर्टात ज्याण्याची परवानगी आहे.
काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सब्बिल यांच्याशीही चर्चा झाली आहे.