काँग्रेसने मागच्या निवडणुकांतील लाजिरवाण्या कामगिरीनंतर आत्मपरिक्षण करणे आवश्यक असल्याचे परखड मत काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी व्यक्त केलं आहे. काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये एकही जागा जिंकता आली नाही, त्याबरोबरच आसाम आणि केरळमध्ये देखील काँग्रेसची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची राहिली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना सिब्बल यांनी हे मत व्यक्त केले होते.
हे ही वाचा:
आदु… आता तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली आहे फक्त
माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह चौधरी यांचे कोरोनामुळे निधन
शोपियानमध्ये तीन घुसखोरांचा खात्मा
कॅनडामध्ये लहानमुलांचेही लसीकरण चालू
“काँग्रेसने या निवडणुकीत अजिबात चांगली कामगिरी केली नाही. ती आसाम आणि केरळमध्ये सपशेल नापास झाली आहे. पक्षाला बंगालमध्ये तर एकही जागा जिंकता आली नाही.” असे मत त्यांनी एएनआयशी बोलताना व्यक्त केले.
कपिल सिब्बल हे काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते, ज्यांनी पक्षाच्या पुनर्बांधणीची मागणी सोनिया गांधींकडे मागच्या ऑगस्ट महिन्यात केली होती.
अशाच प्रकारचा कमलनाथ यांनी देखील काँग्रेसला घरचा आहेर केला आहे. कमलनाथ यांनी तर चक्क ममता बॅनर्जींनाच आपल्या नेता असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी बंगालचे मुख्यमंत्री पद सलग तिसऱ्यांदा मिळवले आहे. हे पद त्यांनी केंद्रीय यंत्रणांशी लढून मिळवलं असल्याची स्तुतीसुमनं त्यांनी उधळली आहे.
सिब्बल यांच्या या मतामुळे काँग्रेसला निवडणुकांबाबत घरचा आहेर मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बंगालमध्ये तर काँग्रेसचा धुव्वा उडाला आहे, तर आसाम आणि केरळमध्ये देखील काँग्रेसची भलतीच पिछेहाट झाली आहे. काँग्रेसला अजूनही पूर्णवेळ अध्यक्ष देखील निवडता आलेला नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसला वाचवण्यासाठी राहूल गांधी यांनाच पक्षाध्यक्ष करा असे विधान मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी केले होते.