कन्नौज बलात्कार प्रकरण: सपा नेता नवाब सिंह यादवचा डीएनए सॅम्पल झाला मॅच!

पोलिसांनी या प्रकरणात नवाब सिंहला ११ ऑगस्ट रोजी केली होती अटक

कन्नौज बलात्कार प्रकरण: सपा नेता नवाब सिंह यादवचा डीएनए सॅम्पल झाला मॅच!

उत्तर प्रदेशच्या कन्नौजमधील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात समाजवादी पक्षाचा नेता नवाब सिंह यादव याला पोलिसांनी अटक केली होती. यानंतर आता या प्रकरणात महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत. नवाब सिंह यादव याचे डीएनए सॅम्पल पीडितेसोबत मॅच झाले असून यामुळे पीडित मुलीने केलेला बलात्काराचा आरोप सिद्ध झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात नवाब सिंह यादव याला ११ ऑगस्ट रोजी अटक केली होती. पीडितेच्या आरोपानंतर नवाब सिंह यादवचे डीएनए सॅम्पल तपासणीसाठी पाठवले होते.

सपा नेता नवाब सिंह विरोधात पीडित मुलीने लिखित तक्रार केली होती. पीडितेच्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी आरोपी नवाब सिंह यादवला अटक केली होती. पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली. पुढे तपसणीत डॉक्टरांनी बलात्काराची पुष्टी केली होती. अहवाल मिळाल्याची माहिती देताना कन्नौजचे एसपी अमित आनंद यांनी सांगितले की, नवाब सिंह यादवचा डीएनए पीडितेकडून घेतलेल्या डीएनएशी जुळतो.

हे ही वाचा..

जम्मूत लष्करी तळावर हल्ला

मैतई-कुकी गटात पुन्हा गोळीबार, महिलेचा मृत्यू !

आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना ईडीकडून अटक

‘IC814- द कंदहार हायजॅक’ वेबसिरीजमध्ये दहशतवाद्यांची मुस्लिम नावे जाणीवपूर्वक लपविली?

पीडित तरुणीने पोलिसांना सांगितलं होतं की, नवाब सिंह यादवने तिला तिर्वा येथील मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीला लावण्याचे आश्वासन दिले होते. या बलात्कार प्रकरणात पीडितेच्या आत्येला सुद्धा आरोपी बनवण्यात आले आहे. आत्येवर मुलीला नवाब सिंह यादवकडे घेऊन गेल्याचा आरोप आहे. सपा नेता खोलीच्या आत पीडित मुलीसोबत दुष्कृत्य करत होता, त्यावेळी आत्या दरवाजाच्या बाहेर उभी होती. पीडित मुलीने आत्येकडे वाचवण्याची विनंती केली. पण आत्या शांत होती. तिने काहीच केलं नाही, अशी माहिती समोर आली आहे. पीडितेच्या आरोपानंतर पोलिसांनी आत्येला सुद्धा अटक केली आहे. दरम्यान, आरोपी आत्येने सुरुवातीपासून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. सपा नेत्याला फसवलं जातय असं आत्येच म्हणण होतं.

Exit mobile version