मुंबई मेट्रोसाठीचे आरे येथील कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्यासाठी एमएमआरडीएने भरपाईची कितीही रक्कम देण्याचे शपथपत्र कोर्टात सादर केले आहे. यावरून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी टिका केली आहे.
याबाबत ट्वीट करताना अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की, “एमएमआरडीएचे कोर्टात शपथपत्र कांजूरमार्ग कारशेडसाठी भरपाईची कितीही रक्कम देऊ… म्हणजे कांजूरमार्गसाठी विकासकांशी मोठे डील झालंय अशी आता खात्री वाटू लागली आहे. टक्केवारी साठीच सरकार हा विषय रेटते आहे. कारशेड साठी सगळा दुराग्रह टक्केवारी साठीच आहे मुख्यमंत्री महोदय… ”
एमएमआरडीएचे कोर्टात शपथपत्र कांजूरमार्ग कारशेडसाठी भरपाईची कितीही रक्कम देऊ… म्हणजे कांजूरमार्गसाठी विकासकांशी मोठे डील झालंय अशी आता खात्री वाटू लागली आहे. टक्केवारी साठीच सरकार हा विषय रेटते आहे. कारशेड साठी सगळा दुराग्रह टक्केवारी साठीच आहे मुख्यमंत्री महोदय…@OfficeofUT
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 3, 2021
आरे मधील कारशेड कांजूरमार्गला हलविण्याच्या निर्णयामुळे मुंबईतील मेट्रोला विलंब होत आहे. राजकिय दुराग्रहामुळे हे कारशेड हलविण्यात येत आहे. मुंबई मेट्रो मार्ग ३ दक्षिण मुंबई ते सीप्झ असा असून त्याचे प्रस्तावित कारशेड आरे येथे करण्यात येणार होते. मात्र निव्वळ राजकीय दुराग्रहाने हे कारशेड कांजूरमार्गला करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळ देण्यासाठी मेट्रोच्या निर्मीतीच्या कामाला सुरूवात केली होती. मात्र त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कारशेडची जागा अजूनही सरकारच्या राजकिय हट्टापायी निश्चित होऊ शकलेली नाही, याचा फटका सर्व सामान्य जनतेला पडतो आहे.