कन्हैया कुमार हा दुसरा नवज्योतसिंग सिद्धू

कन्हैया कुमार हा दुसरा नवज्योतसिंग सिद्धू

बिहारचा मुख्य विरोधी पक्ष राजदने आज कन्हैया कुमारच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाची खिल्ली उडवत म्हटले की, जेएनयूचा माजी विद्यार्थी हा “दुसरा नवज्योतसिंग सिद्धू” आहे. हा काँग्रेस पक्षाला “नष्ट” करेल. काँग्रेसला बुडणारे जहाज म्हणत त्यांची खिल्ली उडवत राजदचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी म्हणाले की, कुमार यांच्या सामील होण्याने पक्षाला काही फायदा होणार नाही.

सीपीआय नेत्याच्या “काँग्रेस हे एक मोठे जहाज आहे, त्यांना वाचवायला हवे” या विधानाचा संदर्भ देऊन श्री तिवारी म्हणाले, “ते आणखी एका नवज्योतसिंग सिद्धूसारखे आहेत जे पक्षाचा आणखी नाश करतील.” कन्हैया कुमारच्या प्रवेशाने काही फरक पडणार नाही. ते पक्षाला वाचवू शकत नाही. काँग्रेस हे बुडणारे जहाज आहे आणि त्यांचे काही भविष्य नाही.” असं शिवानंद तिवारी पत्रकारांना म्हणाले.

हे ही वाचा:

अमरिंदर-शहा भेटीनंतर चन्नी-मोदी भेट

ठाकरे सरकारच्या काळात मराठी भाषा मंत्रालयासमोर भीक मागत उभी आहे

एअर इंडियाबाबत कोणताही निर्णय नाही

तुम्ही संपूर्ण शहराला बंदिस्त केले आहे

आरजेडीच्या नेत्यांनी सांगितले की, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील पक्षाशी सल्लामसलत न करताच कन्हैय्या कुमार यांना काँग्रेसमध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळे पक्ष नाराज आहे. एनडीएच्या विरोधात २०२० ची बिहार विधानसभा निवडणूक लढलेल्या आरजेडीच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडी महागठबंधनाचा काँग्रेस एक भाग आहे.

बिहार काँग्रेसच्या नेत्यांनी या प्रकरणावर काहीही बोलण्यास नकार दिला. कन्हैय्या कुमार याने नुकताच राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणीदेखील तिथे उपस्थित होते.

Exit mobile version