जेएनयू विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष आणि कथित युवा नेता कन्हैया कुमार हा सध्या समाज माध्यमांवर चांगलाच ट्रोल होताना दिसत आहे. कन्हैयाने समाज माध्यमांवर टाकलेल्या एका फोटो वरून नेटकरी त्याची खिल्ली उडवताना दिसत आहेत. या फोटोत असे नेमके आहे तरी काय तिच्यावरून कन्हैया इतका ट्रोल होतोय?
कन्हैया कुमार हा पक्षाचा सदस्य होता. कम्युनिस्ट पक्षाच्या युवक आघाडीचा तो सदस्य असून तो जेएनयू विद्यार्थी संघाचा अध्यक्ष होता. यातूनच तो प्रसिद्ध झाला असून त्याने २०१९ ची लोकसभा निवडणूकही कम्युनिस्ट पक्षातर्फे लढवली होती ज्यात तो पराभूत झाला होता. पण काही दिवसांपूर्वीच कन्हैयाने कम्युनिस्ट पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसचा हात आपल्या हाती घेतला. तेव्हापासूनच कन्हैयावर भरपूर टीका होताना दिसत आहे. कन्हैयाला कम्युनिस्ट विचारधारेशी काहीही देणेघेणे नसून आपल्या राजकीय फायद्यासाठीच तो काँग्रेसमध्ये दाखल झाल्याचे बोलले गेले.
हे ही वाचा:
‘परमबीर गायब’वर टिप्पणी, पण अनिल देशमुखांबद्दल शब्द नाही
दुबई-जम्मू-काश्मीर करार हे भारतासाठी मोठे यश
अभिनेत्याकडून चुकून गोळी सुटली आणि सिनेमॅटोग्राफरचा घेतला जीव!
होय…आर्यनला ड्रग्स पुरवले! अनन्या पांडेची कबुली
तर आता कन्हैयाचा एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये कन्हैया एका खुर्चीत बसून एका आलिशान सोफ्यावर तंगड्या पसरून पुस्तक वाचताना दिसत आहे. या फोटोवरूनच कन्हैयावर सध्द्या टीका होताना दिसत आहे. कारण कन्हैया ज्या ठिकाणी बसला आहे ते एक उच्चभ्रू वर्गासाठीचे पंचतारांकित हॉटेल वाटत आहे. हिमाचल प्रदेश मधील हा फोटो असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
यावरूनच नेटकऱ्यांनी कन्हैयाला चांगलेच ट्रोल केले आहे. काहींनी कन्हैयामध्ये काँग्रेसची संस्कृती चांगलीच रुजली असल्याचे म्हटले आहे. तर कन्हैयाने यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. तर एका कमेंट मध्ये काँग्रेसमध्ये गेल्यावर कन्हैयाला आजादी मिळाली असल्याचे म्हटले गेले आहे.