बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत हिने काही दिवसांपूर्वीच भारताच्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता कंगना रानौत हिने महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. ती म्हणाली की, महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पाठींबा दिलेला नाही. थपडा खाऊन स्वातंत्र्य मिळत नाही, असे विधान कंगनाने केले आहे.
‘गांधींनी कधीही भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पाठींबा दिला नाही, थप्पड खाऊन स्वातंत्र्य मिळत नाही. अशा प्रकारे फक्त भीक मिळते म्हणून आपले आदर्श हुशारीने निवडा’ असे वक्तव्य अभिनेत्री कंगना रानौत हिने केले आहे. तिच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा तिचे नाव चर्चेत आले आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक लेख शेअर केला असून त्या मथळ्यात लिहिले आहे की, ‘तुम्ही एकतर गांधींचे चाहते असू शकता किंवा नेताजींचे समर्थक… तुम्ही दोघांचे समर्थक होऊ शकत नाही. आता ते तुम्हीच ठरवा. दुसरा गाल दिल्याने दान मिळते, स्वातंत्र्य नाही,’ असे वक्तव्य कंगनाने केले आहे.
हे ही वाचा:
भालचंद्र शिरसाट यांच्या गच्छंतीसाठी पालिकेला एक कोटीचा भुर्दंड!
विनोदाच्या नावाखाली वीर दासकडून अमेरिकेत भारताची बदनामी; मुंबईत तक्रार
समुद्रातील पाण्याचे नि:क्षारीकरण करण्याआधी हे तर करा!
राज्यातील १०४ शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचे आमरण उपोषण
कंगनाने लिहिले की, ‘ज्यांच्यात लढण्याची हिंमत नव्हती, पण सत्तेची भूक होती अशांनी स्वातंत्र्यसैनिकांना इंग्रजांच्या स्वाधीन केले. आपल्याला कोणी एका गालावर थप्पड मारली, तर दुसरा गाल पुढे करा, आणि त्यामुळेच तुम्हाला स्वातंत्र्य मिळते, असे त्यांनीच आम्हाला शिकवले. अशा प्रकारे स्वातंत्र्य मिळत नाही, अशी भिक्षा मिळू शकते. तुमचे हिरो हुशारीने निवडा,’ असे कंगना रानौतने म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वीच कंगनाने नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले आणि २०१४ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले, तर १९४७ मध्ये देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे भीक होते, वक्तव्य केले होते.