कंगना राणौत राजकारणात, भाजपामध्ये जाण्याची इच्छा

निवडणूक लढवून जनतेची सेवा करण्याची इच्छा कंगनाने बोलून दाखवली आहे.

कंगना राणौत राजकारणात, भाजपामध्ये जाण्याची इच्छा

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत ही राजकीय मुद्द्यांसह कोणत्याही विषयावर आपले मतं निर्भयपणे व्यक्त करत असते. ती आपल्या राजकीय भूमिकाही वेळोवेळी स्पष्ट करत असते. आता कंगना राणौतने राजकारणात येणार असल्याची घोषणा केली आहे.

कंगना राणौतने हिमाचल प्रदेशमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिच्या या वक्तव्यानंतर भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कंगनाने भाजपामध्ये प्रवेश केला तर तीच स्वागत करू, असे म्हटले आहे. त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकीत कंगना रणौत भाजपकडून निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जातं आहे.

नुकत्याच एका कार्यक्रमाला कंगना राणौतने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने आपल्या राजकीय कारकिर्दीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. आगामी काळात हिमाचल प्रदेशामध्ये पंचायत निवडणूक होणार आहेत. निवडणूक लढवून जनतेची सेवा करण्याची इच्छा कंगनाने बोलून दाखवली आहे. जनतेची इच्छा असेल आणि भारतीय जनता पक्ष मला तिकीट देईल तर ती निवडणूक लढवण्यास मी तयार असल्याचं कंगना म्हणाली. हिमाचल हे कंगनाचे मूळ गाव आहे. त्यामुळे हिमाचलमधून निवडणूक लढवण्याची घोषणा कंगनाने केली आहे.

तसेच कंगना ही राजकीय कुटुंबातून असल्याचेही तिने यावेळी सांगितले. ती म्हणाली, मी राजकीय कुटुंबातून आली आहे. माझे वडील राजकारणात होते. माझ्या वडिलांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक कामे केली. मात्र, २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाले आणि आमचे कुटुंब अधिकृत काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपामध्ये आले.

हे ही वाचा:

सेलिब्रेटीला पाहण बेतलं जीवावर, दक्षिण कोरियात चेंगराचेंगरी

गुजरात सरकार ‘ समान नागरी कायदा’ लागू करण्याच्या तयारीत

…. म्हणून मिलिंद नार्वेकरांची सुरक्षा वाढवली

यूपीएच्या भोंगळ संरक्षण धोरणाचे दौलत बेग ओल्डी एअर बेसवर दफन

दरम्यान, कंगनाच्या वक्तव्यनंतर भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आपले मतं व्यक्त केले आहे. ते म्हणाले, कंगना रणौत भाजपामध्ये प्रवेश करणार असेल तर तिचं स्वागत करू, परंतु तिच्या निवडणूक लढण्याविषयीचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरच घेतला जाईल. भाजपसाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही पक्षात प्रवेश देतो. परंतु निवडणूक लढवावी की नाही, हा माझा वैयक्तिक निर्णय नाही. त्यासाठी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी लागते. पक्षाची एक प्रक्रिया आहे, ती पूर्ण झाल्यानंतरच कंगनाला निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय होईल, असे स्पष्ट मतं जेपी नड्डा यांनी मांडले आहे.

Exit mobile version