वक्फ (सुधारणा) विधेयकावर लोकसभेत १२ तास चर्चा झाल्यानंतर अखेर हे विधेयक मंजूर करण्यात आले. गुरुवार, ३ एप्रिल रोजी यावर बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रानौत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेचं हा भाग्यवान दिवस पाहता आला. संपूर्ण देश आनंदी आहे की, वक्फ बोर्डचा कारभार आता नियमित होईल, अशी आनंदी प्रतिक्रिया कंगना रानौत यांनी दिली आहे.
हिमाचल प्रदेशमधील मंडी येथील लोकसभा खासदार कंगना रानौत यांनी म्हटले की, संविधानापेक्षा कोणीही मोठे या देशात असूच शकत नाही. त्यांच्यासाठी कायदा लागू नव्हता आणि त्यांना बळ मिळाले होते. अनेक देशांचे क्षेत्रफळही नसेल इतक्या क्षेत्रफळावर वक्फ बोर्डने कब्जा केला आहे. पण, आता या नव्या विधेयकामुळे जर त्यांनी काही बेकायदेशीर केले तर कायदेशीर व्यवस्था त्यांना आता प्रश्न विचारू शकते. पूर्वीची स्थिती काय होती ते तुम्ही पाहू शकता. काश्मीर असो, अरुणाचल प्रदेश असो, हिमाचल प्रदेश असो वर्षानुवर्षे रखडलेली कामे आता पंतप्रधान मोदी करत आहेत,” असे कंगना रानौत म्हणाल्या.
विरोधकांकडून वक्फ विधेयकावर होणाऱ्या टीकेबद्दल विचारले असता, कंगना रानौत म्हणाल्या की, “गृहमंत्री अमित शाह, मंत्री किरेन रिजिजू यांनी विधेयकाबद्दल सर्व काही स्पष्ट केले आहे. विधेयकाचा मुख्य मुद्दा असा आहे की, देशाच्या संविधानापेक्षा कोणीही वर नाही. आपल्या देशात वाळवीसारखा खात असलेला भ्रष्टाचार आता संपला आहे हे आपले भाग्य आहे,” असे त्यांनी म्हटले.
VIDEO | Here's what BJP MP Kangana Ranaut (@KanganaTeam) said on Waqf (Amendment) Bill passed by Lok Sabha:
"We have got to see such a fortunate day. If they anything illegal, the legal system can now ask questions. You can see what the condition was earlier. Be it Kashmir,… pic.twitter.com/Xy1ceXNuzG
— Press Trust of India (@PTI_News) April 3, 2025
हे ही वाचा :
केनियन नागरिक असलेल्या महिलेला अटक, २० कोटींचे कोकेन जप्त
एआय स्वीकारण्यात भारत दक्षिण आशियाचे नेतृत्व करणार
“पूल शॉटचा अंदाज चुकला, कोहलीचा खेळ संपला!
सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात १२ तासांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर गुरुवारी सकाळी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. पहाटे २ वाजण्याच्या सुमारास, हे विधेयक २८८-२३२ मतांनी मंजूर झाले. आता हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले आहे. विधेयक धर्माबद्दल नसून मालमत्तेबद्दल आणि तिच्या व्यवस्थापनाबद्दल असल्याचे सरकारने म्हटले आहे. वक्फ बोर्डमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्यामुळे वक्फ मालमत्तेचा महिला आणि मुलांना फायदा होऊ शकला नाही, जे सुधारित कायद्यामुळे शक्य होणार आहे.