शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान महिलांवर बलात्कार झाल्याचे विधान भाजपाच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौट यांनी केल्यानंतर त्यावर शिरोमणी अकाली दलाचे नेते सिमरनजीतसिंह मान यांनी अत्यंत अश्लिल टिप्पणी केली. त्याला कंगनाने चोख उत्तर दिले आहे.
सिमरनजित सिंग मान यांनी म्हटले होते की, बलात्कार कसा होतो हे कंगनाला विचारा. मग ती लोकांना तो कसा होतो हे स्पष्ट करून सांगेल. कारण बलात्काराचा तिला खूप अनुभव आहे. त्यावर कंगना म्हणाल्या की, मला वाटते की, या देशात बलात्काराबद्दल थट्टा उडविणे थांबणारे नाही. एका नेत्याने बलात्कार करणे म्हणजे सायकलवर स्वार होण्यासारखे आहे, अशी टिप्पणी केलेली आहे. भारतात बलात्कार करणे आणि महिलांवर अत्याचार करणे हे गमतीने घेण्यासारखे आहे, अशीच भावना समाजात खोलवर रुजलेली आहे. एखाद्या महिलेला टोचून बोलण्यासाठी याचा वापर अगदी सहज होत असतो, मग ती स्त्री एखादी चित्रपट अभिनेत्री असेल किंवा राजकारणी.
हे ही वाचा:
‘ममता बॅनर्जी किम जोंगसारख्या हुकूमशहा’
पुण्यात २२ वर्षी नौशाद चालवत होता बनावट टेलिफोन एक्स्चेंज
कर्नाटक सरकारला दिव्यांच्या खांबावर असलेल्या धनु्ष्यबाण, गदेच्या प्रतिमा नकोशा!
ममता म्हणतात, बंगाल पेटले तर दिल्लीही पेटेल!
रनौट यांनी मध्यंतरी असे वक्तव्य केले होते की, शेतकरी आंदोलनात महिलांवर बलात्कार झाले होते. त्यावरून मान यांनी हे विधान केले होते.
रनौट यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, शेतकरी आंदोलनामुळे बांगलादेशसारखी स्थिती होऊ शकली असती. पण देशाला भक्कम नेतृत्व लाभलेले असल्यामुळे ते शक्य झाले नाही.
२०१९-२०२०मध्ये देशात शेतकरी आंदोलन झाले होते. त्यावेळी मृतदेह लटकत होते, बलात्कार झाले होते असे कंगना यांनी म्हटले होते. चीन आणि अमेरिकेचे ते कटकारस्थान होते, असेही कंगना यांनी म्हटले होते.