27 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरधर्म संस्कृती'लाल सिंह चढ्ढा' भोवतीच्या नकारात्मकतेचा निर्माता आमीर खानच!

‘लाल सिंह चढ्ढा’ भोवतीच्या नकारात्मकतेचा निर्माता आमीर खानच!

Google News Follow

Related

कंगनाने केली चौफेर टीका

आमीर खानचा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच नेहमी वादाच्या फेऱ्यात सापडतो. सध्या सोशल मिडियावर या बॉलिवूड स्टारचा आगामी लाल सिंह चढ्ढा चित्रपट वादात सापडला आहे. आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणौतने देखील या वादात उडी घेतली आहे. लाल सिंग चढ्ढाबाबत आमीर खान स्वत:च नकारात्मकता पसरवत आहे. या चित्रपटावर बहिष्कार घालण्यामागचा मास्टर माईंड आमीर खानच असून हा त्याचा एक प्रचाराचा स्टंट असल्याचा हल्लाबोल कंगणा राणौतने केला आहे. अमिरने धर्म वा विचारधारेशी निर्मिती थांबवावी असा सल्लाही कंगणाने इन्स्टाग्रामवर अमिरखानला दिला आहे. कंगणाची ही पोस्ट सोशल मिडियावर सध्या व्हायरल होत आहे.

मला वाटते की, आमिरने त्याच्या आगामी लाल सिंह चढ्ढा चित्रपटाबाबत अगदी कौशल्याने नकारात्मकता निर्माण केली असून त्यामागील मास्टरमाइंड तोच आहे आणि पीके हा हिंदूफाेबिक चित्रपट त्यानेच बनवला आहे. धर्म किंवा विचारधारेबद्दलची निर्मिती त्याने थांबवावी, असे कंगनाने इन्स्टाग्रामवर लिहिले आहे.

हे ही वाचा:

झाडू मारण्याचे काम करता करता त्या स्टेट बँकेत झाल्या सहाय्यक महाव्यवस्थापक

विचार बदलला म्हणून काय ठार माराल? उदय सामंत यांचे प्रत्युत्तर

तालिबानच्या छळामुळे शीखांनी सोडले अफगाणिस्तान; दिल्लीत येणार

अविनाश भोसलेंचा ड्युप्लेक्स फ्लॅट तर छाब्रियांची जमीन जप्त

देशाला असहिष्णू म्हणत पीके हिट केला

कंगणाने आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर लिहिले, फक्त दाक्षिणात्य चित्रपटांची नाळ भारतीय संस्कृतीशी घट्ट जुळली आहे किंवा ते तेथील स्थानिक चव असलेले चित्रपट चालतात, हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक चालत नाही. हिंदी चित्रपट बनवताना प्रेक्षकांची नस ओळखावी लागते आणि त्याचा संबंध हिंदू आणि मुस्लिमशी नाही.. आमिर खान जीने हिंदूफोबिक पीके बनवला आणि भारताला असहिष्णु देश म्हणत त्यांच्या आयुष्यातील सर्वात हिट चित्रपट दिला. कृपया याला धर्म किंवा विचारधारेशी जोडणे थांबवा.

वादात सापडण्याची पहिलीच वेळ नाही

आमीर वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१५ मध्ये एका मुलाखतीमध्ये तो म्हणाला की, आपला देश खूप सहिष्णू आहे. परंतु काही लोक असे आहेत ते काहीतरी वाईट पसरवत असतात. केवळ आमीरच नाही, त्याची घटस्फोटित  पत्नी किरण रावने आपल्या मुलांसाठी भारतात राहणे सुरक्षित वाटत नाही असे विधान करून वाद ओढवून घेतला होता. सध्या बायकॉट लाल सिंह चढ्ढा या सध्या सोशल मिडियावर सुरू असलेल्या ट्रेंडवर प्रतिक्रिया देत प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन करताना आमिर म्हणाला की, मला भारत आवडत नाही, असे लोकांना वाटते याचे मला खूप वाईट वाटते. पण ते खरे नाही. मला भारत खूप आवडतो. मी असा आहे.पण काही लोकांना असे वाटते हे दुर्दैवी आहे,” असंही तो म्हणाला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा