केजरीवालांच्या ‘मोगलाई’ वर कंगनाचा घणाघात!

केजरीवालांच्या ‘मोगलाई’ वर कंगनाचा घणाघात!

आपल्या आक्रमक आणि थेट ट्विट्स मुळे सदैव चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणावत ही पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी कंगनाच्या निशाण्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आले आहेत. यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात सहभागी झालेल्या दिल्ली सरकारच्या चित्ररथाचे निमित्त ठरले आहे.

२६ जानेवारी निमित्त राजधानीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ सहभागी होतात. हे वर्षही त्याला अपवाद नव्हते. एकीकडे महाराष्ट्र, उत्तराखंड, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश सारख्या राज्यांनी आपापल्या राज्यातील मंदिरे आणि भक्ती परंपरेचे दर्शन घडवले, तर दुसरीकडे दिल्ली राज्य सरकारच्या चित्ररथाची संकल्पना ‘शहाजहाँबाद’ ही होती. नेमका हाच धागा पकडून कंगना राणावत हिने दिल्ली सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

“दिल्ली ही ना सेक्युलर आहे, ना सहिष्णू, ती फक्त बादशाहाची आहे” असे कंगना ने आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे. आजच्या चित्ररथाच्या चेहऱ्यातून स्पष्ट झाले आहे आणि अशा परिस्थितीत ती परत मिळवायची वेळ आली आहे असेही कंगनाने लिहिले आहे.

“हा भारताच्या राजधानीच्या शहराचा चित्ररथ आहे. एखाद्या मुस्लिम किंवा ख्रिश्चन बहुल देशात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात हे होऊ शकले असते का?” असा तिखट सवालही तिने विचारला आहे.

Exit mobile version