कांदे भुजबळ वाद गेला उच्च न्यायालयात

कांदे भुजबळ वाद गेला उच्च न्यायालयात

नांदगावमधील पूरस्थितीबाबत झालेल्या बैठकीत जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून पालकमंत्री छगन भुजबळ तसेच आमदार सुहास कांदे यांच्यात सुरु असलेला वाद वाढतच आहे. आमदार सुहास कांदे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यांवर चांगल्याच टीकेच्या फैरी झाडल्या आहेत. त्यानंतर लागलीच छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडत सुहास कांदे यांना संपूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले.

आक्रमक असलेले भुजबळ पत्रकार परिषदेत बॅकफूटवर आलेले दिसले. या प्रकरणात चर्चेची तयारी दर्शवत मुख्यमंत्री जो निर्णय देतील, तो मान्य असणार असल्याचे सांगितले. संबंधित वादाची याचिका कांदे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे हा वाद विकोपाला गेल्याचे आता लक्षात येत आहे. तसेच आमदार सुहास कांदे यांचे उच्च न्यायालयात जाणे चुकीचे आहे. आपले मुख्य न्यायाधीश उद्धव ठाकरे आहेत. ते मला सांगतील. चुकले असेल तर मी चुकले म्हणत माघार घेईन, असे भुजबळ म्हणाले.

हे ही वाचा:

आरोग्य विभाग परीक्षेचे काम ‘त्या’ न्यासाकडेच! परीक्षेनंतर म्हणे दंड ठोठावणार

गुलाब चक्रीवादळामुळे झाली ३५ लाख हेक्टर शेती उद्ध्वस्त

अकरावी कोट्याअंतर्गत प्रवेशप्रक्रियेत विद्यार्थी नव्हे कॉलेजचालकांचे हित

तुम्ही संपूर्ण शहराला बंदिस्त केले आहे

भुजबळ म्हणताहेत, आमदार सुहास कांदे यांच्या ज्या अडचणी आहेत, त्या आम्ही दूर करु. मी त्यांना पुर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहे. बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्याचा राग त्यांच्या कुटुंबीयांना राहिला नाही, यांनाच का? असा सवालही करत माझ्याकडून या विषयाला पूर्णविराम दिला आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. तसेच पालकमंत्री म्हणून सगळ्यांना समान वाटप करणे हे माझे काम आहे. यावरून हायकोर्टात जाणे योग्य नाही. मुख्यमंत्री हे शिवसेनेचे आहेत, हे त्यांना सांगा. मुख्यमंत्र्यांना पटले तर ते पालकमंत्री बदलतील. त्यामुळे सध्याच्या घडीला सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातील वादामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होतेय की काय असेच आता वाटू लागले आहे.

Exit mobile version