‘उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव बुडवले’

‘उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव बुडवले’

साध्वी कांचन गिरी आणि जगतगुरू सुर्याचार्य दोघे मुंबईत आले आहेत. काल त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली. उद्धव ठाकरे यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरे यांचे नाव बुडवले आहे, असे मत कांचन गिरी यांनी व्यक्त केले. त्यावेळीच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची स्तुती केली.

कांचन गिरी म्हणाल्या की, ‘उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला काहीही बोलायचे नाही, कारण त्यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरे यांचे नाव बुडवलं आहे. बाळासाहेब ठाकरे जे बोलत तेच करून दाखवत. ते हिंदुत्ववादी होते. बाळासाहेब हिंदुंसाठी वाघ होते’, असे त्यांनी सांगितले.

‘उद्धव ठाकरेंवर मी नाराज आहे. त्यांनी मुस्लिमांसोबत जाऊन पक्ष बनवला आहे, असे वक्तव्य करत असतानाच पालघरमध्ये हत्याकांड झाले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपले कान आणि डोळे बंद केले होते, अशी टीकाही त्यांनी केली.

हे ही वाचा:

काय आहे इस्रायमधल्या ‘मायबोली’ मराठी मासिकाची कथा?

ठाकरे सरकार म्हणजे, ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’

हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी राज ठाकरे जाणार अयोध्येला

सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्ताच्या घरी सापडले एक कोटी

तसेच त्यांनी राज ठाकरे यांचे कौतुक करत त्यांच्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते, असे त्यांनी सांगितले. राज ठाकरे आक्रमक नेते आहेत. त्यांच्यात बाळासाहेबांची छबी दिसते. तेच बाळासाहेबांचा संकल्प पूर्ण करतील असे सांगतानाच उत्तर भारतीयांबाबत राज यांच्या मनात पूर्वग्रह निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठीच मी मुंबईत आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, साध्वी कांचन गिरी यांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तब्बल तासभर त्यांनी राज ठाकरेंशी चर्चा केली. राज ठाकरे यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले आहे. हिंदू राष्ट्र मजबूत करण्याचा राज यांचा निर्धार असून त्यांनी अयोध्येला येण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे.

Exit mobile version