कमला हॅरिस यांनी औपचारिकपणे स्वीकारले अध्यक्षपदासाठीचे नामांकन

कमला हॅरिस निवडून आल्यास त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष ठरतील

कमला हॅरिस यांनी औपचारिकपणे स्वीकारले अध्यक्षपदासाठीचे नामांकन

अमेरिकेत लवकरच निवडणुक होणार असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी औपचारिकपणे डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी स्वीकारली आहे. त्यामुळे त्या आता रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. अमेरिकेचे आताचे अध्यक्ष जो बायडन यांनी निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर कमला हॅरिस यांचे नाव पुढे आले होते. त्यानंतर आता अखेर कमला यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीचे नामांकन औपचारिकपणे स्वीकारले आहे.

अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात या निवडणुकीत चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. भारतीय वंशाच्या हॅरिस यांनी गुरुवारी रात्री शिकागो येथे ‘डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शन’ दरम्यान त्यांची उमेदवारी स्वीकारली. यासह त्या राष्ट्रपती पदाची उमेदवार बनणाऱ्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या दुसऱ्या महिला नेत्या ठरल्या.

हे ही वाचा:

अरविंद केजरीवालचं दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार

ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राची डायमंड लीगच्या अंतिम फेरीत धडक

पूर्व द्रुतगती महामार्गावर मोटार झाडावर आदळली, दोन ठार

पोलिओग्रस्त वृद्ध दाम्पत्याला ६० लाखांना फसवले, २ लाख परत मिळाले!

यावेळी कमला हॅरिस म्हणाल्या की, विरोधक डोनाल्ड ट्रम्प हे गंभीर व्यक्ती नसून त्यांना पुन्हा अध्यक्ष बनवण्याचे परिणाम खूप गंभीर असतील. तसेच त्यांनी युक्रेनला रशियाबरोबरच्या युद्धात पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे. अध्यक्षपदी निवडून आल्यास युक्रेन आणि त्यांच्या नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन (नाटो) सहयोगींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार. हॅरिसची आई श्यामला गोपालन या भारतीय होत्या आणि त्यांचे वडील डोनाल्ड जॅस्पर हॅरिस हे जमैकाचे नागरिक होते. विशेष म्हणजे कमला हॅरिस निवडून आल्यास त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष असणार आहेत.

Exit mobile version