मध्य प्रदेशातून सध्या मोठी बातमी येत आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपमध्ये जाणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.मात्र कमलनाथ यांचे पुत्र खासदार नकुल नाथ आणि काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करू शकतात असे बोलले जात आहे.काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर कमलनाथ यांनी पक्षात राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मंत्री सज्जन वर्मा यांनी रविवार, १८ फेब्रुवारी रोजी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची नवी दिल्लीत भेट घेतली होती.
कमलनाथ यांच्या निवासस्थानी पार पडलेली बैठक सुमारे तीस मिनिटे चालली.बैठकीनंतर सज्जन सिंग वर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधला.कमलनाथ यांच्याशी कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली हे सज्जन सिंग वर्मा यांनी माध्यमांसमोर सांगितले.ते म्हणाले की, कमलनाथ यांच्याशी माझी चर्चा झाली.काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही त्यांच्याशी चर्चा केली आहे. मी ४० वर्षांपासून त्यांच्यासोबत आहे. कमलनाथ जिथे असतील तिथे मी राहीन, असे वर्मा म्हणाले.ते पुढे म्हणाले की, कमलनाथ अजूनही काँग्रेसमध्ये आहेत, उद्याही काँग्रेसमध्ये राहतील, परंतु परवा काय होईल हे सांगता येत नाही.तसेच आमचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांच्याबाबतीत आम्ही नाराज नाही, ते तर आमचे लहान बाळ आहेत, असे वर्मा म्हणाले.
हे ही वाचा:
नॅशनल कॉन्फरन्सनंतर पीडीपीही ‘इंडिया’तून बाहेर
चंदीगडच्या भाजपा महापौरांचा पदाचा राजीनामा; आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
काँग्रेसच्या प्रमोद कृष्णम यांचे आमंत्रण; मोदींनी केली कल्की मंदिराची पायाभरणी!
केंद्र सरकार आणखी चार पिकांवर किमान आधारभूत किंमत देण्यास तयार
सज्जन सिंह वर्मा पुढे म्हणाले की, कमलनाथ यांचे लोकसभेच्या २९ जागांवर लक्ष आहे.तिकीट कोणाला द्यायचे याचा विचार करत आहेत.त्यानुसार ते मांडणी करत आहेत. कमलनाथ यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या वृत्ताचे स्पष्ट खंडन केले आहे.वर्मा म्हणाले की, कमलनाथ यांनी प्रश्न केला आहे की, मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे असे कोणाला म्हणालो? मीडियानेच हा मुद्दा उचलला आणि मीडियाच याच उत्तर देईल.
दरम्यान, कमलनाथ हे भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे सज्जन सिंह वर्मा सांगितले.मात्र, कमलनाथ यांचे पुत्र खासदार नकुल नाथ आणि काही आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.परंतु, कमलनाथ यांनी यावर अद्याप कोणतेही भाष्य केले नाही.