पंतप्रधानांनी पिठोरागडमध्ये केले कैलास दर्शन, भक्तांसाठी नवा मार्ग

उत्तराखंडमध्ये विविध योजनांचे केले उद्घाटन

पंतप्रधानांनी पिठोरागडमध्ये केले कैलास दर्शन, भक्तांसाठी नवा मार्ग

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमध्ये पिठोरागडमध्ये कैलास व्ह्यू पॉइंट येथून कैलासाचे दर्शन केले. जोलिंगकोंग या भागातून कैलासाचे दर्शन होते. यासाठी चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटमध्ये जाण्याची गरज नाही.

 

पंतप्रधान गुरुवारी उत्तराखंडमध्ये विविध कार्यक्रमांसाठी आलेले होते. पंतप्रधानांनी पार्वती कुंड येथेही पूर्जा अर्चना केली. याठिकाणाहून २० किमी अंतरावर चीनची सीमा सुरू होते. नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत त्यांनी भारत चीन सीमेजवळून कैलासाचे दर्शन केले.

 

 

सकाळी ९ वाजता पंतप्रधान तिथे उपस्थित होते. त्यांनी कैलास व्ह्यू पॉइंट येथून मनोभावे कैलासाचे दर्शन घेतले आणि महादेवाचे स्मरण केले. त्यानंतर ते पार्वती कुंड येथे गेले. कैलासाचे दर्शन केल्यानंतर उत्तराखंडमधील धारचुला येथे ७० किमी अंतरावर आणि १४ हजार फूट उंचीवर गुंजी या गावी ते गेले. तिथे त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. हे गाव येत्या दोन वर्षांत शिव धामच्या रूपात रूपांतरित होणार आहे. कैलास व्ह्यू पॉइंट, ओम पर्वत यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी धारचुला हे आता महत्त्वाचे ठिकाण ठरणार आहे. तिथे आता भक्तनिवास आणि हॉटेल्सची उभारणीही केली जाईल. तिथे भारतीय टेलिकॉम कंपन्यांचे नेटवर्कही उपलब्ध होईल.

 

हे ही वाचा:

मुंबई पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलीस भरतीला सुरुवात!

… म्हणून राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख बदलली

‘हमासला पृथ्वीवरून नामशेष करू’!

पुण्याचा उपनिरीक्षक झाला रातोरात करोडपती!

दुपारी १ वाजता पंतप्रधान अल्मोडाच्या जागेश्वर धामला पोहोचले. तिथे त्यांनी शिवलिंगाची पूजा केली आणि त्यावर जल अर्पण केले. आरतीही केली. शंख फुंकून डमरूही वाजविला. हे मंदिर ६२०० फूट उंच ठिकाणी स्थित आहे. तिथे दगडांची २२४ मंदिरे आहेत.

 

 

पंतप्रधान पिठोरागड येथे ग्रामीण विकास, रस्ते, वीज, सिंचन योजना, पाणी, शिक्षण, आरोग्य व आपत्ती प्रतिबंध यासंदर्भाती विविध योजनांचे उद्घाटन करणार होते. ४२०० कोटींच्या या योजना आहेत.

Exit mobile version