ठाकरे-राव भेट! तिसऱ्या आघडीच्या उचक्या पुन्हा सुरु

ठाकरे-राव भेट! तिसऱ्या आघडीच्या उचक्या पुन्हा सुरु

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले असून त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे पुन्हा एकदा देशाच्या राजकारणात तिसऱ्या आघाडीच्या उचक्यांना सुरुवात झाली आहे. के. चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला असून यावेळी तिसऱ्या आघाडी संबंधी सूतोवाच केले आहे.

देशात परिवर्तनाचा मोर्चा महाराष्ट्र सुरु झाला आहे असे यावेळी राव यांनी सांगितले. तर महाराष्ट्रातून सुरू झालेला मोर्चा कधीच अपयशी ठरत नाही असेही ते म्हणाले. बिगर एनडीए राज्यातील मुख्यमंत्र्यांची लवकरच एक भेट हैदराबाद किंवा अन्यत्र आयोजित करण्याबाबत राव यांनी भाष्य केले आहे. तर या बैठकीत आम्ही एकत्र भेटू, चर्चा करू आणि पुढील रस्ता निश्चित करु असे राव यांनी सांगितले.

हे ही वाचा:

मिठागराच्या जमिनीवर सेना आमदार उभारणार थीम पार्क?

तेलंगणाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना का भेटत आहेत?

‘भुजबळांची बेनामी मालमत्ता पाहण्यासाठी गेलो म्हणून एफआयआर

लोकपालची मागणी करणारे केजरीवाल लोकायुक्त नियुक्त करत नाहीत

तर देशात सध्या गधूळ आणि सूडाचे राजकारण सुरू आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. हे वातावरण दिवसेंदिवस अधिक गढूळ होत चालले आहेत. हे आमचं हिंदुत्व नाही असे ठाकरे म्हणाले. देशाचे पुढे काय होईल याचा कोणी तरी विचार करण्याची गरज होती तो आम्ही केला आहे. सध्या राज्या राज्यांमध्ये शेजारधर्म विसरला गेला आहे. पण तेलंगण आणि महाराष्ट्र सख्खे शेजारी आहेत. आमच्यात एक हजार किलोमीटर आहे असे उद्धव ठाकरेंनी अधोरेखीत केले. एका नव्या विचारांची ही सुरुवात आहे. त्याला आकार यायला वेळ लागेल. पण ते आम्ही मेहनतीने करू. आम्ही दोघांनी मिळून एक दिशा ठरवली आहे आणि त्यावरून जायचे ठरवले आहे असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Exit mobile version