के.सी. पाडवी नवे विधानसभा अध्यक्ष?

के.सी. पाडवी नवे विधानसभा अध्यक्ष?

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड झाल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांचे नावही आघाडीवर आहे. याच संदर्भात एक महत्त्वाचे विधान त्यांनी केले आहे.

“राजकारणात चर्चा होत असतात. तशीच विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी माझ्या नावाची चर्चा आहे.” असे के.सी. पाडवी यांनी स्पष्ट केले. नंदूरबारच्या धडगाव तालुक्यातील दुर्गम भागात विविध कार्यक्रमाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या चर्चेअगोदर माझ्या नावाची चर्चा प्रदेशाध्यक्षपदासाठी होत होती. राजकारणात चर्चा कायम होत असतात. मात्र अशा परिस्थितीत आपण न थांबता पक्षासाठी काम करत राहणं महत्त्वाचं असतं. मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा

नाना पटोले यांनी विधानसभा सभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता विधानसभेच्या अध्यक्षपदावर कोण विराजमान होणार? अशी चर्चा सध्या जोरात सुरु आहे. त्यात पृथ्वीराज चव्हाणांपासून ते के.सी.पाडवी यांच्या नावापर्यंत चर्चा होत आहे. त्यातच काँग्रेसचे पुण्यातील भोर तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाचीही चर्चा होत आहे. विधानसभा सभापती म्हणून काँग्रेस थोपटेंवर विश्वास दाखवू शकतं अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सध्या काँग्रेसमध्ये विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र असे दोन गट पडले आहेत. त्यात थोपटे सभापती झाले तर विदर्भाला मिळालेला मान पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात मिळेल.

Exit mobile version