वडिलांचे नाव नीट न लिहिता येणारे वडिलांचा वारसा कसा चालवणार?

शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल

वडिलांचे नाव नीट न लिहिता येणारे वडिलांचा वारसा कसा चालवणार?

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे २२ जानेवारी रोजी नाशिकमधील काळाराम मंदिरात जाऊन विधीवत पूजा करणार आहेत याशिवाय गोदावरी तीरी आरती सुद्धा करणार आहेत. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना निमंत्रण पाठविण्यात येणार आहे. यासाठीचे पत्र उद्धव ठाकरेंनी शनिवार, १३ जानेवारी रोजी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवले होते. मात्र, या पत्रावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे.

शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत टीका केली आहे. या पत्रात बाळासाहेब ठाकरे यांचे नावचं चुकीचे लिहिल्याचे वाघमारे यांनी निदर्शानास आणून दिले आहे. यावरून ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “राष्ट्रपतींच्या निमंत्रणात वडिलांचे नाव नीट लिहिता येत नाही ते वडिलांचा वारसा कसा चालवणार?? ठाकरेंचा ठ पत्रात चुकला कारण उद्धव ठाकरे सोनिया पवारांपुढे झुकले,” अशा शब्दात ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरेंवर घाणाघाती टीका केली आहे.

हे ही वाचा:

आज मणिपूरपासून सुरू होणार काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा

५५ वर्षांचे संबंध संपवत मिलिंद देवरांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

चीनपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध

देशातील बहुतांश मुस्लिम अयोध्येतील राम मंदिराच्या बाजूने

जानेवारीच्या २२ तारखेला उद्धव ठाकरे नाशिकमधील काळाराम मंदिरात पूजा करणार असून गोदावरीची आरती सुद्धा करणार आहेत. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना निमंत्रण पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे खासदार राष्ट्रपती यांना भेटून निमंत्रण पत्रिका देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. “आमची अशी प्रामाणिक इच्छा आहे की हा एवढा मोठा प्रसंग आहे तिथे या देशाला राष्ट्रपती देखील आहेत आणि त्यांची सुद्धा महत्त्वाची भूमिका जशी त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी निभावली होती किंवा त्यांना बोलवण्यात आलं होतं तसं राष्ट्रपतीने तिकडे बोलावं बोलावावं,” अशी मागणी त्यांनी केली.

Exit mobile version