कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना तब्बल ३६ तास भारतात अडकून राहावे लागले. जी-२० परिषदेसाठी ते भारतात आले होते. मात्र विमानातील तांत्रिक अडचणीमुळे त्यांना मायदेशी जाता येत नव्हते.
अखेर मायदेशी परतण्यासाठी मुहूर्त त्यांना सापडला. अखेर बऱ्याच विलंबानंतर त्यांना आपल्या मायदेशी म्हणजे कॅनडाला जाणे शक्य झाले आहे. तब्बल ३६ तास ते भारतातच अडकून पडले होते. ट्रुडो भारतात जी-२० परिषदेला उपस्थित राहून दोन दिवसांत निघणार होते पण त्यांच्या विमानातील बिघाडामुळे त्यांचा प्रवास रखडला. पण अखेर ट्रुडो यांना मायदेशी परतण्याचा मुहूर्त सापडला. कॅनडा पंतप्रधान कार्यालयाचे माध्यम सचिव मोहम्मद हुसेन म्हणाले की, विमानातील तांत्रिक विषय आता सुटला आहे आणि विमान कॅनडाला जाण्यासाठी निघणार आहे.
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्रुडो यांची भेट घेतली आणि त्यांनी जी-२० परिषदेला उपस्थित दर्शविल्याबद्दल त्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारमधील माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने मी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांचे आभार मानण्यासाठी इथे विमानतळावर आलो आहे.
जी २० परिषदेतील अनेक कार्यक्रमांना अनुपस्थित होते. त्यावरून विविध तर्क लढवले जात आहेत. त्याचवेळी ही परिषद आटपून ते रविवारी रात्री निघणार होते, मात्र विमानात तांत्रिक अडचण आल्याने त्यांचा दौरा लांबला.
हे ही वाचा:
‘मत्स्य ६०००’ च्या साथीने भारत समुद्राच्या उदरातील रहस्य उलगडणार
१०० कुटुंबांचं हसतं खेळतं गाव भुईसपाट
जी-२०च्या यशस्वी आयोजनाबद्दल भारताचे जगभरातून कौतुक
पवार कुणबी व्हायला तयार आहेत का?
कॅनेडियन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ट्रूडो हे जी २० परिषदेच्या अधिकृत भोजन समारंभालाही उपस्थित नव्हते.’ ‘पक्षपातीपणा बाजूला ठेवून मला असे सांगावेसे वाटते की, कॅनडाच्या पंतप्रधानांना उर्वरित जगाकडून वारंवार अपमानित आणि पायदळी तुडवले गेलेले पाहणे कोणालाही आवडणार नाही,’ असे वक्तव्य कॅनडाचे खासदार आणि विरोधी पक्षाचे नेते पियरे पॉइलीव्हरे यांनी ‘एक्स’वर नोंदवले होते. जी २० शिखर परिषदेदरम्यान त्यांच्या संघर्षानंतर ट्रुडो रविवारी रात्री भारत सोडणार होते, परंतु ते दिल्लीतच अडकून पडले. त्यांना दुसऱ्या विमानाने जाण्यासाठी एक नव्हे तर दोन रात्री दिल्लीत व्यतीत कराव्या लागतील. कॅनडाच्या सशस्त्र दलाने ट्रूडो यांना घेऊन जाण्यासाठी एक विमान पाठवले होते, मात्र त्यात तांत्रिक समस्या उद्भवली.
कॅनडाच्या सीटीव्ही न्यूजनुसार, पंतप्रधान जी २० नेत्यांच्या भोजन समारंभाला अनुपस्थित होते. मात्र त्यांनी असे का केले, हे सांगण्यास कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाने असमर्थता दर्शवली. त्यानंतर रविवारी राजघाटावर जी २० नेत्यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली, तेव्हाही ते नव्हते.