24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणअनिल देशमुखांना क्लीन चीट नाही; फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न

अनिल देशमुखांना क्लीन चीट नाही; फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न

न्या. चांदिवाल यांचा मुलाखतीत दावा

Google News Follow

Related

महाविकास आघाडी सरकारच्या काळात १०० कोटी वसुली प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाली होती. यानंतर जामिनावर बाहेर आलेल्या अनिल देशमुख यांनी एक पुस्तक लिहून प्रकाशित केलं. शिवाय या प्रकरणाच्या चौकशीसाठी जो आयोग नेमण्यात आला होता, त्या निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल आयोगाने क्लीन चिट दिलेली असल्याचा दावा अनिल देशमुखांकडून वारंवार केला जात आहे. यावर आयोगाचे प्रमुख निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. अनिल देशमुख यांना क्लीनचीट दिलेली नाही. अहवालात क्लीनचीट हा शब्दच वापरला नसल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये अनिल देशमुख गृहमंत्री होते. त्याचं काळात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं ठेवल्याची घटना घडली. त्यानंतर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांनी १०० कोटी वसुलीचं टार्गेट पोलिसांना दिल्याचा आरोप केला होता. दरम्यान, चांदीवाल आयोगाने आपल्याला क्लीनचीट दिल्यामुळेचं शासनाकडून अहवाल सार्वजनिक केजा जात नाही, असा आरोप अनिल देशमुखांकडून केला जातो. पण, अनिल देशमुखांचा क्लीनचीटचा दावा फेटाळून लावत; योग्य पुरावे आयोगासमोर येऊ दिले नाही, असा दावाचं न्या. चांदिवाल यांनी केला आहे.

अनिल देशमुख यांना क्लीनचीट दिलेली नाही. मी माझ्या अहवालात क्लीनचीट हा शब्दचं वापरला नाही. परमबीर सिंह यांनी जी माघार घेतली, त्याबद्दल अहवालात टीका केली आहे. पण क्लिनचीट दिलेली नाही. साक्षी पुरावा आला नाही. अहवालात पुरावा नाही, असं म्हटलं आहे. परमबीर सिंह, सचिन वाझे यांनी त्यांच्याकडे पुरावे असूनही दिले नाहीत. पुरावे दिले असते तर नक्कीच काही घडलं असतं, असं स्पष्टीकरण न्यायमूर्ती चांदिवाल यांनी दिले आहे.

हे ही वाचा : 

‘बॅगेत कपडेच आहेत, युरीन पॉट नाही’

इंदिरा गांधी स्वर्गातून आल्या तरी ३७० कलम परत येणार नाही!

जम्मू-काश्मीरमध्ये ११९ दहशतवादी सक्रिय, बहुतांश पाकिस्तानी!

हिंदुहितासाठी, राष्ट्रहितासाठी करा १०० टक्के मतदान !

न्या. चांदिवाल यांनी म्हटले आहे की, सचिन वाझेने अजित पवार आणि शरद पवार यांची नावं घेतली होती. मात्र, ती नावे रेकॉर्डवर घेणार नाही, असे वाझेंना सांगितले. फडणवीसांना गुंतवण्याचाही प्रयत्न वाझे आणि देशमुखांनी केला. मात्र, ते रेकॉर्डवर घेतले नाही. त्यातून प्रसिद्धी मिळते. ते मला होऊ द्यायचे नव्हते. राजकीय व्यक्तींना गुंतवून स्वतःच्या प्रसिद्धीचा मिळवायचा प्रयत्न दिसत होता, मात्र मी ते होऊ दिले नाही. सचिन वाझेने शपथपत्रात अजित पवार, शरद पवारांचे नाव घेतले. वाझे आणि अनिल देशमुखांनी फडणवीसांचे नावही गुंतवण्याचा प्रयत्न झाला. मात्र हे प्रसिद्धीसाठी सुरू असल्याचं लक्षात येताच आम्ही हे रेकॉर्डवर घेतले नाही, असं चांदिवाल यांनी स्पष्ट केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा