‘४ जून ही बीजेडी पक्षाची एक्स्पायरी डेट’

पंतप्रधान मोदींची ओडिशात गर्जना

‘४ जून ही बीजेडी पक्षाची एक्स्पायरी डेट’

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(६ मे) ओडिशा दौऱ्यावर होते.ओडिशातील गंजम येथील एका सभेला पंतप्रधान मोदींनी संबोधित केलं.यावेळी पंतप्रधान मोदींनी राज्यातील सत्ताधारी बिजू जनता दल (बीजेडी) वर निशाणा साधला.ते म्हणाले की, ४ जून रोजी बीजेडी सरकारचा कालावधी संपणार आहे, त्यांची एक्स्पायरी डेट लिहून ठेवली आहे.१० जून रोजी भाजपचे उमेदवार ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, असा दावा पंतप्रधान मोदींनी यावेळी केला.

सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की,यावेळी ओडिशामध्ये एकाच वेळी दोन यज्ञ होत आहेत.एक यज्ञ देशात, भारतात मजबूत सरकार बनवण्याचा आहे आणि दुसरा यज्ञ ओडिशामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार स्थापन करण्याचा आहे.

हे ही वाचा:

‘चांद्रयान-३’ च्या यशस्वी मोहिमेवरून सागरी प्राण्याला मिळाली नवी ओळख!

गडचिरोली पोलिसांकडून कुकरमध्ये पुरून ठेवलेली ९ आयईडी, ३ क्लेमोर स्फोटके नष्ट

‘टी -२० विश्वचषकावर दहशतवादी हल्ल्याचे सावट’

पीओके भारतात सामील होण्याबाबत केलेल्या विधानावर अब्दुल्ला म्हणतात, पाकिस्तानने बांगड्या भरलेल्या नाहीत

ते पुढे म्हणाले की, भाजप जे काही बोलतो ते करतो.येथे सरकार स्थापन केल्यानंतर आम्ही आमच्या संकल्प पत्रात केलेल्या घोषणांची पूर्ण ताकदीने अंमलबजावणी करू.बीजेडीवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले, बीजेडी सरकारची मुदत संपत आली आहे, ४ जून ही त्यांची एक्सपायरी डेट आहे.आज ६ मे आहे, ६ जूनला भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निश्चित होईल. १० जून रोजी भुवनेश्वरमध्ये भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार.मी आज सर्वांना भाजप सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आलो आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, ओडिशामध्ये बीजेडी पक्षाची घसरण झाली, काँग्रेसचा पराभव झाला आणि लोकांचा आता भाजप पक्षावर विश्वास असून भाजपचा उमेदवार एक नवा आशेचा सूर्य बनून आला आहे.ओडिशामध्ये बीजेडीचे लहान नेते सुद्धा मोठ्या बंगल्याचे मालक झाले आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Exit mobile version