भाजप अध्यक्ष नड्डा यांचे सोनिया गांधींना सडेतोड प्रत्युत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून सरकारच्या कोरोनाची परिस्थिती हाताळण्याच्या पद्धतीवर टीका करणाऱ्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी सडेतोड भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. नड्डा यांनी काँग्रेस पक्षावर सतत नकारात्मकता पसरवणे, कांगावखोरपणा आणि कद्रू वृत्ती असल्याचे आरोप केले आहेत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय सभांमुळे कोरोना पसरला या सोनिया गांधींच्या टीकेला देखील त्यांनी उत्तर दिलं. काँग्रेस पक्षाचे अनेक नेते हे अशा राजकीय सभा घेऊन प्रचार करत होते याची आठवण त्यांनी सोनिया गांधींना करून दिली.
“आधी लॉकडाऊनला विरोध करणे, मग लॉकडाऊनचं समर्थन करणे. केंद्र सरकारने जारी केलेल्या गाईडलाईन्सचं पालन न करणे आणि मग गाईडलाईन्स पाठवल्याच नाहीत असे सांगणे, केरळमध्ये मोठ्या प्रचार सभा घेऊन इतर राज्यांमधील प्रचार सभांच्या बाबतीत वेगळी भूमिका घेणे. कोविडच्या काळात आंदोलनांना समर्थन करणे, पण कोविड नियम पाळण्याची भाषा करणे. या तुमच्या पक्षाच्या दुटप्पी भूमिकांमुळे अनेक संकटं निर्माण होत आहेत.”
याशिवाय राहुल गांधींविषयी बोलताना, राहुल गांधींचे वर्तन हे दुटप्पीपणा आणि कद्रूपणाचे होते, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारने अर्णब, कंगनाशी लढण्यात घालवले दीड वर्ष
अहमदनगरमधील लॉकडाऊन ५ दिवसांनी वाढवला
माजी खासदार पप्पू यादव यांना अटक
मुंबईतील रुग्ण पुण्यात पाठवणे हेच मुंबई मॉडेल?
“ज्या देशात लस घेण्याविषयी लोकांचा विरोध असण्याचा कोणताही इतिहास नाही. अशा देशात लोकांच्या मनात शंका निर्माण करण्याचं पाप तुमच्या पक्षाने केलं आहे. कोवॅक्सिन या स्वदेशी लसीबद्दलही अफवा पसरवण्याचे काम तुमच्या नेत्यांनी केले आहे.” असेही जेपी नड्डा म्हणाले.