भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा दिब्रुगढ, जोऱ्हाट आणि बिस्वनाथ चारली याठिकाणी आसाममधल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सभा घेणार आहेत.
आसामममध्ये १२६ जागांसाठी निवडणुक होणार आहे. तीन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ २७ मार्च रोजी होणार आहे तर शेवटचा टप्पा ६ एप्रिल रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीचा निकाल २ मे रोजी लागेल.
हे ही वाचा:
मी तुम्हाला बंगालच्या लोकांच्या विकासाला आणि स्वप्नांना लाथ मारू देणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोलहात येथे झालेल्या सभेत ‘दुसरी बार भाजपा सरकार’ अशी घोषणा दिली आहे. आसाममध्ये दुसऱ्यांना एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानंतर आसाम दुहेरी इंजन पाहील असे सांगण्यात आले आहे.
भाजपाने काँग्रेसच्या १५ वर्षांच्या सत्तेला पूर्णविराम देत २०१६ मध्ये आसाम राज्यात पहिल्यांदा सत्ता स्थापन केली. भाजपा आणि आसाम गण परिषद (एजीपी) आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ) यांनी एकत्रित पणे १२६ पैकी ८६ जागांवर विजय प्राप्त गेला होता आणि सरकार स्थापन केले होते.
आसाम बरोबरच पश्चिम बंगालमध्येही निवडणुका होणार आहेत. तेथे तृणमुल काँग्रेस आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. आज पश्चिम बंगाल येथील बंकुरा येथे नरेंद्र मोदी यांनी विशाल सभेला संबोधित केले होते.