भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाला आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू करावी लागेल असे आदेश दिले आहेत.
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सोमवारी पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी २०२३ मध्ये नऊ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे महत्त्व अधोरेखित केले आणि या सर्व निवडणुका जिंकण्यासाठी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला सज्ज होण्याचे आवाहन यावेळेस केले.भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना नड्डा यांनी अध्यक्षीय भाषणात याबाबत संपूर्ण माहिती दिली.
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आयोजित पत्रकार परिषदेत नड्डा यांच्या भाषणाचा तपशील प्रसारमाध्यमांना सांगितला.त्याप्रमाणे नड्डा म्हणाले की २०२३ हे वर्ष आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि आम्हाला नऊ राज्यांमध्ये निवडणूक लढवायची आहे.
प्रसाद यांनी पुढे सांगितले की, राष्ट्रीय अध्यक्षांनी संपूर्ण कार्यकारिणीला निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले,आम्हाला सर्व नऊ राज्यांमध्ये विजय नोंदवायचा आहे.
केंद्रातील सत्ताधारी पक्ष २०२४ मध्ये तिसर्यांदा पुन्हा सत्तेवर यावे यासाठी आपले संघटन मजबूत करण्यासाठी काही काळापासून अनेक प्रयन्त चालू आहे.
Glimpses from Day 1 of BJP National Executive Meeting being held in New Delhi.#BJPNEC2023 pic.twitter.com/sPrku6UwuX
— BJP (@BJP4India) January 16, 2023
येथील नवी दिल्ली नगरपरिषदेच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या भाषणात नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताच्या प्रगतीचे कौतुक केले. पक्षाध्यक्ष यावेळेस म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, मोबाईल फोनचा दुसरा सर्वात मोठा निर्माता आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील तिसरा सर्वात मोठा उत्पादक बनला आहे.
पूर्वी जिथे दररोज बारा किलोमीटर महामार्ग बांधले जात होते, तिथे आज ते ३७ किलोमीटर पर्यंत पोचले आहेत.
ते पुढे म्हणाले की, देशाने मोफत अन्नधान्यासह अनेक कल्याणकारी योजनांद्वारे गरीबांना सक्षम बनवण्याचे काम सुरु केले आहे.
हे ही वाचा:
गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास
कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी
महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती
नड्डा यांनी नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयाचे “असाधारण आणि ऐतिहासिक” म्हणून स्वागत केले आणि १८२ सदस्यांच्या विधानसभेत १५० हून अधिक जागा जिंकणे ही एक खूप मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, हिमाचल प्रदेशमध्ये पक्षाचा काँग्रेसकडून पराभव झाला, परंतु दोन्ही पक्षांमधील मतांमधील फरक एक टक्क्यांपेक्षा सुद्धा कमी आहे.