26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणकंगना-उर्मिलामध्ये पुन्हा जुंपली.

कंगना-उर्मिलामध्ये पुन्हा जुंपली.

Google News Follow

Related

 

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री कंगना राणावत आणि उर्मिला मातोंडकर यांच्यात पुन्हा शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. ही शाब्दिक लढाई ट्विटरच्या कुरुक्षेत्रात जुंपली आहे. कंगना यांनी ट्विट करत उर्मीलावर टीका केली आणि उर्मिला यांनी व्हिडिओ पोस्ट करत त्याला उत्तर दिले.

कंगना राणावत आणि उर्मिला मातोंडकर या दोन्ही अभिनेत्री आपल्या राजकीय भूमिकांमुळे सतत चर्चेत असतात. उर्मिला यांनी काँग्रेस तर्फे लोकसभा निवडणूक लढवली होती. पण काही महिन्यापूर्वी काँग्रेसचा ‘हात’ सोडला आणि ‘शिवबंधन’ बांधले. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उर्मिला यांनी नुकतेच ३ कोटी रुपयांचे नवे कार्यालय खरेदी केले आहे. या संबंधातील बातमी ट्विट करताना कंगना यांनी उर्मिलावर टीका केली आहे.

“प्रिय उर्मिलाजी मी माझ्या मेहनतीने बनवलेली घरे पण काँग्रेस तोडत आहे. भाजपा ला खुश करुन माझ्या हाती फक्त २५-३० केसेस लागल्या आहेत. जर मी तुमच्या इतकी समजूतदार असते तर मी काँग्रेस ला खुश केलं असतं. किती मुर्ख आहे मी??” असे म्हणत उपहासात्मक ट्विट कंगना यांनी केली आहे.

कंगनाच्या ट्विटला उर्मिलाने एक व्हिडीओ ट्विट करत उत्तर दिले आहे. अवघ्या दिड मिनिटांच्या या व्हिडिओत उर्मिला यांनी कंगना यांना आव्हान दिले आहेत. “कंगनाजी तुमचे माझ्याबद्दलचे उच्च विचार मी आणि संपूर्ण देशानेच ऐकले आहेत. तुम्ही जागा आणि वेळ माझ्या व्यवहाराचे सगळे कागदपत्र घेऊन येते” असे उर्मिला यांनी म्हटले आहे. “तुमच्याकडे एनसीबी साठी अनेक लोकांची लिस्ट आहे असे म्हणाला होतात. ती यादी तेवढी तुम्ही येताना घेऊन या.” असे आव्हान उर्मिलांनी दिले आहे.

या दोघींच्या भांडणाची ही पाहिलीच वेळ नाही. याआधीही वृत्त वाहिन्यांच्या मुलाखतीत यांनी एकमेकींची उणीदुणी काढली आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा